भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आवाहने दिवसोंदिवस वाढत आहेत. गुरूचा पुतळा उभारून ज्ञान क्षेत्रात अव्वल, तरबेज असलेल्या एकलव्यने द्रोणाचार्यांच्या आपल्या
भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आवाहने दिवसोंदिवस वाढत आहेत. गुरूचा पुतळा उभारून ज्ञान क्षेत्रात अव्वल, तरबेज असलेल्या एकलव्यने द्रोणाचार्यांच्या आपल्या आवडत्या शिष्याला मागे टाकले. याच भीतीपोटी गुरु द्रोणाचार्य यांनी धनुर्विद्या मध्ये पारांगत असलेल्या एकाग्र – कुशल ज्ञानवंत एकलव्यास आपल्या उजव्या हाताचा अंगठा गुरु दक्षिणा म्हणून मागितला होता. एकलव्याने मागचा पुढचा विचार न करता तो दिलाही. मात्र आजच्या शिक्षण पध्दतीत झालेले बदल, सक्तीचे व सर्वांना मोफत शिक्षण हक्क हा कायद्याने दिलेला अधिकार आहे. मुले – मुली यांच्यात भेद न करता समान शिक्षणाचा पुरस्कार करणारी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल ही झालेला आहे. मात्र काय गुरु द्रोणाचार्य यांच्या सारख्या गुरूंच्या विचारसरणीमध्ये बद्दल झाला असेल का?.. याचा सारासार विचार प्रत्येक भारतीय नागरिकांनी केल्यास याचे उत्तर बऱ्याच अंशी नकारार्थी येते.
पूर्वीच्या काळात नव्हे तर स्वातंत्रोत्तर काळामध्ये महिला- मुलींना शिक्षण क्षेत्रात ज्ञानार्जन करण्यास मुभा होती का? याचा विचार आजच्या प्रगत पालकांनी करावा. हे एवढं सगळं सांगण्यामागे ‘आजची शिक्षण पद्धती आणि ज्ञान मंदिरात मुलींची अब्रू ओरबाडणारे ‘कु’ गुरु’ हे आहे. तशी स्त्रीच्या अब्रूची लचके तोडणारी जमात आजची नाही, तर ती स्त्रीला भोग, विलासी समजणारी परंपरागत विकृत मानसिकतेच्या जमात आहे. ज्ञान मंदिरात ही मानसिकता बोकाळली असल्याचे वारंवार सिद्ध होत आले आहे. हल्लीच यातील एक प्रकार नुकताच समोर आला आहे. नावाने गुरु ‘कु’ल असलेल्या नामांकित शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला.
वासनांध ‘कु’ गुरुने विद्यार्थीनीची छेड काढून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्या ‘कु’ गुरुचा प्रताप समजताच त्याला सुज्ञ पालकांनी चांगलेच बदडून काढले.. त्या ‘कु’ गुरू विरोधात रीतसर पोलिसात गुन्हाही नोंद करण्यात आला. मात्र या प्रकारावरून मोफत व सक्तिचे आणि सर्वांना समान शिक्षण ह्या मूलभूत अधिकाराचे मुलींच्या बाबतीत त्यांच्या अधिकाराचे हनन होत असेल तर ही निंदनिय बाब आहे. नव्हे तर आजही स्त्री शिक्षण नाकारणारी आणि तिला भोग विलासी समजणारी ही विकृत मानसिकतेची जमात आशा ‘कु’ गुरुकुल मध्ये ठाण मांडून बसली आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या वेळीच नांग्या कायद्याने ठेचणे गरजेचे. पालकांकडून भरमसाठ पैसा उकळ्याण्यासाठी ज्ञान क्षेत्रात विविध शिक्षण संस्था कार्यरत असून शिक्षणाच्या नावानं बाजार भरवून नंगा नाच चालविला जात आहे. मुलींना सुरक्षीरित्या निर्भयपणे शिक्षण घेण्यासाठी अशी व्यवस्था त्याठिकाणी आहे का? विकृत मानसिकतेचा ‘कु’ गुरू त्या संस्थेत कार्यरत आहे का? असेल तर त्याची हाकालपट्टी करण्यासाठी किंवा असा विकृत कु गुरू ज्ञान मंदिरात येऊच नये यासाठी पालकांसह संबंधित शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाने कोणते मापदंड आखले आहेत? मुलींना सुरक्षीत निर्भयपणे शिक्षण घेता येत नसेल तर पालकांनी मुलींना शिकवू नये का? हाच प्रश्न मुलींच्या माता- पित्यांना यानिमित्ताने पडला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांची मुले-मुली शिकली पाहिजेत यासाठी जीवाचा आटापिटा केला. मात्र आजचे शिक्षण सम्राट विद्यार्थी आणि पालकांच्या जिवावावर उठल्याचे दिसत आहे. फिस भरू न शकल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी गळफास घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मुलांचे शिक्षण आपल्याकडून होत नसल्याने माता-पित्यांनी आपलं जीवन त्यागल असल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र कोणतीही चारित्र्य पडताळणी न करता आशा गुरु ‘कु’लच्या माध्यमातून आमच्या लेकींच्या अब्रूवर, तीचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी ही वासनांध विकृत मानसिकता टप्पून बसली असेल तर त्यांना कडक शासन होणे आवश्यक. कोण जाणे ही विकृत मानसिकतेची गिधाडं यापूर्वी असं कुकर्म करून पुन्हा गुरु’कु’ल मध्ये स्थानापन्न झाली असतील? आणि त्यांना असे कुकर्म करण्याची नवी संधी दिली जात असेल? अशा विकृत मानसिकतेपासून आपल्या मुला-मुलींचे रक्षण करण्याची जबाबदारी पालकांवर येऊन ठेपली आहे. आशा गुरू’कु’ल संस्थांच्या चालकांना जाब विचारण्याची वेळ आली आता आली आहे. उद्याचा समाज आणि भावी पिढीचे भविष्य घडविणारी जमात ‘कु’ गुरू ज्ञान मंदिरात भक्षक रुपात दडून बसले असली तर बहुजन समाजातील मुले आणि मुलांचे भविष्य काय असेल? त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या धोरणकर्त्यांसह गुरू’कु’लच्या नांग्या वेळीच ठेचाव्या लागतील, यात तिळमात्र शंका नाही. गुरुकुल सह इतर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराला ही व्यवस्था जबाबदार आहे. एकीकडे शिक्षणात विषमता आहे. याचे संदर्भ धोरणकर्त्यांशी आहेत. शिक्षा पे चर्चा हा ड्रामा आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे.
COMMENTS