सोलापूर प्रतिनिधी - राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या ६ मागण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आज सुरू केला. शहराती
सोलापूर प्रतिनिधी – राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या ६ मागण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आज सुरू केला. शहरातील सर्व कर्मचारी वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स या महाविद्यालयाच्या गेटसमोर संयुक्त कृती समितीकडून हातात फलक घेऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मागण्या मांडल्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सोलापुरातील विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. गेल्या चार वर्षापासून सहा मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेवरही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. राज्य शासनाच्या विरोधात आज वालचंद कॉलेज समोर निदर्शने केली. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षा बहिष्कार टाकल्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
COMMENTS