Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यातील पुढील वर्षीचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्याने : ना. शंभूराज देसाई

मुंबई / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यालाही राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. पुढील वर्षीपासून हा शाही दसरा महोत

पश्‍चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; 5 लाख 60 हजार ग्राहकांना पुनर्वीज जोडणी संधी
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी
पर्यटन विकास योजनेतून टेबल लॅन्ड पठारावरील वाहनतळासाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी : आ. पाटील

मुंबई / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यालाही राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. पुढील वर्षीपासून हा शाही दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. सातारा येथील दसरा महोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. पुढच्या वर्षीपासून सातारा येथे शाही दसरा महोत्सवाच्या नियोजनाबाबत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासोबत पालकमंत्री म्हणून मी स्वतः चर्चा करणार आहे, अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यास मोठी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. हा जिल्हा शूरांची आणि वीरांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. राज घराण्याची परंपरा सातारा जिल्ह्यास आहे. ही परंपरा जगासमोर आणण्यासाठी पुढील वर्षीपासून सातारा येथे दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सातार्‍याला जागतिक पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

COMMENTS