Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी ः सध्याच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत सत्यगाव येथील गावकर्‍यांनी आणि पुस्तक प्रकाशन समितीने

आमदार काळेंच्या निधीतून 84 लाखांच्या कामांना मान्यता
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी

कोपरगाव प्रतिनिधी ः सध्याच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत सत्यगाव येथील गावकर्‍यांनी आणि पुस्तक प्रकाशन समितीने नवोदित लेखिका पूजा बाळकृष्ण सांगळे यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य, आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढाकार घेतला ही आनंदाची बाब आहे. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्याबरोबरच तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

येवला तालुक्यातील सत्यगाव येथील कवयित्री पूजा बाळकृष्ण सांगळे यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य, आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवर्य प. पू. राजूबाबा सोनवणे (आजंदे) यांच्या हस्ते शनिवारी झाले. सत्यगाव येथील गावकर्‍यांनी आणि पुस्तक प्रकाशन समितीने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्यास विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून लेखिका पूजा सांगळे यांना शुभेच्छा दिल्या.  पूर्वी आपल्या गावाची प्रगती तिथे असलेल्या वाचनालय-ग्रंथालयावरून ठरवली जात असे. मात्र, आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो.  आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत वाचनापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी विधान परिषद सदस्य किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, नाशिक येथील व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे येवला तालुका संचालक नंदकिशोर बनकर, नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष ड.माणिकराव शिंदे, येवला पंचौय समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड, युवा सेना विस्तारक प्रियांका जोशी (बुलडाणा), कांदा उपादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे,सरपंच परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक योगेश पाटील (एम.आय.टी. पुणे), अभिनेता, लेखक जयेश पवार, प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, लेखक किरण आवारे, मनसेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे, ज्येष्ठ हिंदी अनुवादक प्रा. डॉ.जिभाऊ मोरे आदी मान्यवरांसह सांगळे परिवार, सत्यगावचे ग्रामस्थ, पुस्तक प्रकाशन समितीचे पदाधिकारी, ग्रंथप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS