दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी

शिर्डी प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले 5000 किलो केशर आंबे श्री साईबाबा सं

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी कार्यवाही करा
उपअधीक्षक मिटकेंची समर्थ निसर्गोपचार केंद्रास भेट
नगर अर्बनच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट

शिर्डी प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले 5000 किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्तव्यवस्था, शिर्डीच्या श्री साईप्रसादालयात देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, साईभक्त दिपक करगळ यांची स्वताःची मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्या पिकविलेले व उच्च प्रतीचे आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासुन साईभक्त श्री.करगळ हे केशर आंबे संस्थानला देणगी स्वरुपात देत आहे. यावर्षी सुमारे 04 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 5000 किलो केशर आंबे देणगी स्वरुपात संस्थानच्या श्री साईप्रसादालयात दिलेले आहे. दोन दिवस या आंब्यांच्या रसाचे प्रसाद भोजन साईभक्तांना, दोन्ही रुग्णालय येथील रुग्णांना तसेच अनाथाश्रम, वृध्दाश्रम आदी ठिकाणी देण्यात येणार असल्याचे ही श्रीमती बानायत यांनी सांगितले.

COMMENTS