Homeताज्या बातम्यादेश

भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली : जगातील विविध देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला असतांना देखील भारतात मात्र रुग्णसंख्येत घट असल्याचे दिसून आले आहे. द

शाळांना २ मे पासून ११ जूनपर्यंत उन्हाळी सुटी
तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त l DAINIK LOKMNTHAN
एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची हकालपट्टी

नवी दिल्ली : जगातील विविध देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला असतांना देखील भारतात मात्र रुग्णसंख्येत घट असल्याचे दिसून आले आहे. देशात काल 173 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 1,209 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

चीन पाठोपाठ जपानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांमध्ये बीएफ.7 व्हेरियंटचा संसर्ग पसरला असून कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. शिवाय अमेरिकेमध्ये एक्सबीबी व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसत आहे. या तुलनेने भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.भारतात गेल्या 24 तासांत 173 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. चीन, जपान, ब्राझील, अमेरिकेसह दक्षिण कोरियामधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. भारतात सध्या कोरोनाचे 2670 सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी, 2 जानेवारी नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना संसर्गाची प्रकरणे आता 4,46,78,822 वर पोहोचली आहेत. यामधील 4,41,45,445 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

COMMENTS