Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावर असल

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा – पालकमंत्री दादाजी भुसे
ठाकरे गटाला हादरे शिवसेनेसह धनुष्यबाण शिंदे गटाला
अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असून या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशीद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहीम आणि सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उद्ध्वस्त केले होते. तर दुसर्‍याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मुंब्रा येथील डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला 15 दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काहींनी याविरोधात एकवटण्यास सुरुवात केली. अविनाश जाधव यांनी मुंब्रा अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर हम उसे जिंदा नही छोडेंगे, कोई गुस्ताख छुप न पाएगा, हम उसे ढुंड ढुंढ के मारेंगे   अशा आशयाचा व्हीडीओ सोशल मीडियाात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी  बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

COMMENTS