Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्माघाताने नव्हे चेंगराचेंगरीमुळे मृत्यू – नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, काँगे्रस नेते न

सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु
चोरट्यांनी कार चालकाला रस्त्यावर फरफटत नेले
दुकानात काम करण्यास नकार दिल्याने युवकास मारहाण

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, काँगे्रस नेते नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर करत, पुरस्कार सोहळ्यावेळी झालेले मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा दावा केला असून, त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईतल्या खारघर येथे डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, या सोहळ्यात आलेल्या 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, विरोधकांकडून सरकार काहीतरी लपवतेय असा आरोप होत आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच हा व्हिडिओ महाराष्ट्र भूषण सोहळ्यातल्या असल्याचा दावा केलाय. त्यात चेंगराचेंगरी झाल्याचे दिसते. त्यामुळे काही जणांचा जीव गेल्याचे समजते. हा व्हिडिओ ट्विट करून नाना पटोले म्हणतात की, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा झाला. 120 एकराचे हे मैदान असून, येथे अनेक सत्संगाचे कार्यक्रम होतात. मात्र, या ठिकाणी केवळ एक झाड आहे. त्यामुळे हे कार्यक्रम संध्याकाळी होतात. तरीही राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे रणरणत्या उन्हात आयोजन केले. कार्यक्रमाची वेळ सकाळी 10.30 वाजेची होती. मात्र, सूत्र संयोजकांनी व नंतरच्या भाषणांनी मोठा वेळ घेतला. परिणामी हा कार्यक्रम तब्बल दुपारी एक वाजता संपला. सेवकांना कार्यक्रम स्थळातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागले. परिणामी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 7 लाख लोक उन्हात होते. त्यामुळे कित्येकांना उष्माघाताचा त्रास झाला. मात्र विरोधकांनी श्री सदस्यांचा मृत्यू उष्माघाताने नव्हे तर चेेंगराचेंगरीने झाल्याचा दावा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS