Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश कोकरे बीआरएस पक्षात

गेवराई वार्ताहर - राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत बागपिंपळगाव येथील सक्रिय विद्यमान सदस्य आकाश मच्छिंद्र कोकरे यांनी बाळासाहेब मस्के यांच्या ने

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील अपघातात दोघांचा मृत्यू
रिक्षाच्या अपघातात एक ठार, दोन जखमी
जान्हवी कपूरने ‘ओम शांती ओम’चा ‘तो’ आयकॉनिक सीन केला रिक्रिएट

गेवराई वार्ताहर – राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत बागपिंपळगाव येथील सक्रिय विद्यमान सदस्य आकाश मच्छिंद्र कोकरे यांनी बाळासाहेब मस्के यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारत राष्ट्र समिती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे बाळासाहेब मस्के यांनी पक्षात स्वागत केले.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखरराव यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात बीआरएस पक्षांनी चांगलीच एन्ट्री मारली असून  गेवराई तालुक्याच्या राजकारणात ही बाळासाहेब मस्के आणि मयुरीताई खेडकर – मस्के यांच्या पक्ष प्रवेशाने तालुक्यातील राजकरण चांगलेच तापले आहे, त्यांच्या मुळे जनतेला गेवराई तालुक्यात एक नवा पर्याय उपलब्ध झाला असून तालुक्यातील युवक व कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत येत आहेत, येणार्‍या काळात बाळासाहेब मस्के यांच्या नेतृत्वात पक्षाला उभारी मिळेल हे निश्चित,दिनांक 18 जुलै रोजी बागपिंपळगाव येथील राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश कोकरे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.

COMMENTS