Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विज्ञान व तंत्रज्ञानप्रेमींच्या महोत्सवाला आजपासून सुरुवात

मुंबई : आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे 27 वे पर्व सर्वांच्या भेटीस आले आहे. यंदा हा महोत्सव 27, 28 आणि 29 डिसेंबर 2023 रोजी पवईतील संकुलात रंगणार

ज्येष्ठ काँग्रेस नेते किरण रेड्डींचा भाजपमध्ये प्रवेश
’अम्फान’इतकेच घातक ठरणार ’यास’ चक्रीवादळ
Breking ! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई : आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’चे 27 वे पर्व सर्वांच्या भेटीस आले आहे. यंदा हा महोत्सव 27, 28 आणि 29 डिसेंबर 2023 रोजी पवईतील संकुलात रंगणार आहे. यंदाचा ‘टेकफेस्ट’ हा ‘गूढ क्षेत्र : जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते’ (द मिस्टिकल रिल्म : व्हेअर इमॅजिनेशन मीट्स रिऍलिटी) या संकल्पनेवर आधारित आहे.
‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष व उद्योगपती आकाश अंबानी या महोत्सवात उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. ‘दिग्गजांचे मार्गदर्शन असणारी व्याख्यानमाला’, ‘आंतरराष्ट्रीय रोबोवॉर’, ‘विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित नाविन्यपूर्ण स्पर्धा, खेळ आणि प्रदर्शन’, ‘इंटरनॅशनल समिट अंतर्गत फिनटेक आणि इंडस्ट्री समिट’ आदी विविध उपक्रम होणार आहेत. यंदाच्या ‘टेकफेस्ट’मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असून भारतातील शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. ‘टेकफेस्ट’अंतर्गतच्या व्याख्यानमालेत पहिल्याच दिवशी बुधवार, 27 डिसेंबर रोजी रिलायन्स जिओचे अध्यक्ष व उद्योगपती आकाश अंबानी हे विद्यार्थ्यांना देशातील दूरसंचार आणि डिजिटल सेवांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारताची अत्याधुनिक बोफोर्स 40 एमएम ऑटोमॅटिक गन एल/70 चे प्रदर्शन, ट्रोन बॉईज क्रिव-इनडोअर टेक्स, आंतरराष्ट्रीय ड्रोन रेसिंग स्पर्धा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) डॉ. जी. सथीश रेड्डी यांचे मार्गदर्शनपर सत्र होईल. तसेच रोबोटिक्स, मेषमिराइज, ‘हॅक-ए-आय’, टेकफेस्ट ऑलम्पियाड, रोबोकॅप लीग, रोबोसॉकर, रोबोरेस, रोबोसुमो आदी विविध स्पर्धा रंगतील. तसेच ‘फिनटेक आणि इंडस्ट्री 4.0’ या दोन्ही समिटमध्ये जगभरातील तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रातील दिग्गज एकत्र येत मार्गदर्शन करणार आहेत.

COMMENTS