सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठलाग, दोघांवर गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठलाग, दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : मूळची मुंबईची व सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीचा इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅप आणि मोबाईलवर फोन करून पाठलाग करण्या

कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात विष घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
शेवगाव तहसिलवर जनशक्ती विकास आघाडीचा मोर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी : मूळची मुंबईची व सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीचा इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅप आणि मोबाईलवर फोन करून पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत अश्‍लील शब्दांचा उच्चार केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दोन मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास इन्स्टाग्रामवर अविनाश जरे नावाने खाते असलेल्या व्यक्तीने हाय डॉक्टर, असा मेसेज केला होता. त्यानंतर रात्री साडेदहाच्या दरम्यान व्हिडीओ कॉल करण्यात आला होता. बुधवारी दुपारी फोन करून अश्‍लील शब्द वापरत विनयभंग केला. सोशल मिडीयावर वारंवार मेसेज करीत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पिडीतेच्या भावाला फोन करीत तुझ्या बहिणीला उचलून नेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून दोन मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस. पी. गर्जे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS