राष्ट्रवादीत मोठा भूकंप… पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीत मोठा भूकंप… पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे…

प्रतिनिधी : जळगावराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगावात मोठा भूकंप घडला आहे. स्थानिक नेतेमंडळीकडून होत असलेल्या राजकारणाला कंटाळून महानगराध्यक्ष अभिषेक पा

नाना पटोले यांचे घूमजाव ; माझ्या वक्तव्याचा विपर्यास
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा : अजित पवार यांचे निर्देश
औसा शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – उपमुख्यमंत्री

प्रतिनिधी : जळगाव
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगावात मोठा भूकंप घडला आहे. स्थानिक नेतेमंडळीकडून होत असलेल्या राजकारणाला कंटाळून महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह वेगवेगळ्या 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत.

हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मनाला जात आहे . पाटील यांनी आपला राजीनामा थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापले आहे .

अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष म्हणून उत्तमप्रकारे काम करत होते . मात्र स्थानिक नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे आपल्याला काम करता येत नाही, असाही थेट आरोप पाटील यांनी केल्याने पक्षातील कुरघोड्या समोर आल्या .

अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या 12 फ्रंटल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, इत्यादी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे .

अभिषेक पाटील यांच्या जागी एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अशोक लाडवंजारी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अभिषेक पाटील यांची उचलबांगडी करण्यासाठी ते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना ऐकत नाहीत, त्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतात,

अशा प्रकारच्या तक्रारी प्रदेश पातळीवर पद्धतशीरपणे पोहचवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षसंघटना मजबूत होईल, असे अपेक्षित होते. मात्र त्या विरुद्धच घडत असल्याने पक्षसंघटना गटातटात विभागल्या गेल्याच्या चर्चा आहे.

COMMENTS