Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधकांकडून पालकमंत्री सावे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र-अजय शिंदे

बीड प्रतिनिधी - सकारात्मक व सरळ स्वभावाचे नेते म्हणून बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांची ओळख आहे. असे असताना विरोधकांकडून डॉ. साबळे यांच्या प्रकरण

माकडाने लहान मुलीचा घेतला चावा
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे बावनकुळे तर अकोल्यातून खंडेलवाल विजयी
 बुलढाणा राजुर घाटात बस पलटी, 40 प्रवासी किरकोळ जखमी

बीड प्रतिनिधी – सकारात्मक व सरळ स्वभावाचे नेते म्हणून बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांची ओळख आहे. असे असताना विरोधकांकडून डॉ. साबळे यांच्या प्रकरणात जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र काही विरोधकांनी केले आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना अशा प्रकारे बदनाम केले जात असेल तर, याचा आम्ही निषेध करतो. असे महात्मा फुले युवा दलाचे जिल्हाप्रमुख अजय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तीन दिवसांपूर्वी बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाचे आदेश आरोग्य मंत्री यांनी दिले. या प्रकरणात बीड येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बीड जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन डॉ. साबळे यांचे निलंबन रद्द करा, अशी मागणी केली आहे, महात्मा फुले युवा दलाची पण ही मागणी आहे. पण या प्रकरणात बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांचा काडीचाही संबंध नाही, असे असताना पालकमंत्री सावे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. असा आरोप महात्मा फुले युवा दलाचे जिल्हाप्रमुख अजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नामदार अतुल सावे एक सरळ स्वभावाचे मंत्री आहेत. त्यांनी कधीही कुठल्या अधिकार्‍यांचा द्वेष करत नाहीत सरळ सरळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी कोणाबद्दल कारवाई करण्यासाठी सांगू शकत नाहीत. या प्रकरणांमध्ये माननीय आमदार पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि या प्रश्नावर मंत्री महोदयांनी उत्तर देताना आम्ही त्यांना निलंबित करत आहोत असा आदेश दिला असताना पालकमंत्री अतुल सावे यांचा या प्रकरणांमध्ये कुठेच काही संबंध नसताना जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.

COMMENTS