विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे बावनकुळे तर अकोल्यातून खंडेलवाल विजयी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे बावनकुळे तर अकोल्यातून खंडेलवाल विजयी

नागपूर/अकोला : विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या असून, नागपूर आणि अकोल्यातील जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आपली विजयी

मोठी कारवाई ! 71 लाखांचा गुटखा जप्त
23 कोटीच्या अपहार प्रकरणी फरार कारकूनाच्या संभाजीनगरमधून आवळल्या मुस्क्या
सलमान खानने अंकिता लोखंडे समोर विक्की जैनचे सत्य उघड केले

नागपूर/अकोला : विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या असून, नागपूर आणि अकोल्यातील जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. नागपुरात महाविकास आघाडीची मते मोठया प्रमाणात फुटल्यामुळे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे सहज विजयी झाले. तर अकोल्यात देखील भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या पारड्यात तब्बल 443 मते पडली होती, तर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते पडली होती. या प्रक्रियेमध्ये 31 मते बाद ठरली.
चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. त्यांनी या निवडणुकीत तब्बल 176 मतांनी विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे रविंद्र भोयर यांना एका मतावर समाधान मानावे लागलेय. काँग्रेसने मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्‍चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. महाविकास आघाडीची 16 मते फुटली तर भाजपला 44 अतिरिक्त मते मिळाली.
दरम्यान, विजयानंतर बोलतांना बावनकुळे यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. 318 मते भाजपा आणि सहयोगी पक्षांकडे होती. 240 मते महाविकास आघाडीकडे होती. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 186 मते मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे तेवढी तरी मत त्यांना मिळाली. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हुकुमशाही भूमिका, दोन मंत्र्यांच्या दबावाखाली पक्षाला वेठीस धरणे, काँग्रेस पक्षातले कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते, मतदार अस्वस्थ होते. हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचे हे परिणाम असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार – नवाब मलिक
अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

या विजयाने महाविकास आघाडीला चपराक – फडणवीस
भाजपच्या दोन्ही जागा निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असं मांडलं जात असलेलं गणित चुकीचं आहे हेही या विजयानं स्पष्ट केले असल्याचे फडणवीस म्हणाले.

COMMENTS