Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग म्हणजे सकारात्मकता ऊर्जा स्रोत, दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासन सदैव तत्पर:-  मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल

नाशिक - समाजातील दिव्यांगाना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मात्र त्यावर ते मात करून आपली वाटचाल करीत आहेत, त्यामुळे ते सकारात्मक ऊर्जा स्रो

कोरोणाची तिसरी लाट रोखण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज, आ,निलेश लंके l पहा LokNews24
जागतिक भांडवलदारांच्या आर्थिक सत्ताकारणाचा भारतीय अर्थ!
 ऑक्सीजन हब हिमायत बाग वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

नाशिक – समाजातील दिव्यांगाना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मात्र त्यावर ते मात करून आपली वाटचाल करीत आहेत, त्यामुळे ते सकारात्मक ऊर्जा स्रोत असून या दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासन सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल यांनी केले आहे.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नाशिक व महानगरपालिका नाशिक यांच्या वतीने येथील कालिदास कला मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

दिव्यांगांमध्ये निश्चितच सर्व सामान्याप्रमाणे गुणवत्ता असून त्यांना देखील व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे.  विविध संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या  विविध कार्यक्रमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे, असेही श्रीमती मित्तल यांनी सांगून उपस्थित सर्वांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्यात.

तसेच विविध संस्थातील गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा सन्मान देखील यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. जैन सोशल मेन ग्रुप नाशिकच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना 1000 ब्लॅंकेटचे देखील वाटप मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले.

सकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढली होती या रॅलीचा समारोप येथील कालिदास कला मंदिरात करण्यात आला. कवी वसंत सानप यांच्या ‘छोट्यांची बालगीत यात्रा’ व ‘हिरवे स्वप्न ‘ या २ पुस्तकाचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीच्या विद्यार्थ्यांनी सदर प्रसंगी पथनाट्य च्या माध्यमातून दिव्यांग अधिनियमातील तरतुदीचे विवेचन केले. याप्रसंगी रविंद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, हर्षल नेहते, जिल्हा आरोग्य अधिकारी,  प्रशांत पाटील, उपायुक्त समाज कल्याण विभाग मनपा, नाना शिंदे, योगेश वाणी, ईश्वर कुमावत अशासकीय सदस्य, जिल्हा दिव्यांग कल्याण समिती, अशोक कटारिया, जैन सोशल मेन ग्रुप नाशिक, शशिकांत पाटील जनसंपर्क अधिकारी समाज कल्याण विभाग, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे , ललित पवार, बबल्लू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.प्रशांत पाटील यांनी  महापालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध योजनांची माहिती करून दिली.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.योगेश पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येत असल्या विविध योजनांची माहिती करून देत दिव्यांग बांधवांचे यूआयडी  नोंदणी करून सदर कार्ड जिल्ह्यात पूर्ण वाटप करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांचे देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्था दिव्यांग संस्था यामधील विद्यार्थी शिक्षक व पालक तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण व दिव्यांग विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS