Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडसेंना दिलासा; अटक टळली

पुणे ः गेल्या अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार असलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, त्यांची अटक तूर्तास

ओमायक्रॉनचा प्रसाराचे प्रमाण जास्त असल्याने काळजी घ्यावी : डॉ. भारती पवार
गुंगीचे औषध घालून महाविद्यालयीन तरुणीवर कब्बडीपटूचा बलात्कार
श्री अंबाबाई मंदिरात चोरी करताना दोन महिलांना रंगेहात पकडले

पुणे ः गेल्या अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार असलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, त्यांची अटक तूर्तास टळली आहे. पुण्यातील पुण्यातील भोसरी या ठिकाणच्या एमआयडीसीतील भूखंड प्रकरणात मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणात मंदाकिनी यांची कोठडी ईडीने मागितली होती. अखेर न्यायालयाने मत स्पष्ट केले आहे. यात ईडीला  चौकशी करायची असल्यास 24 तासांपूर्वी कल्पना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच अटकपूर्व जामीनावर 21 तारखेला सुनावणी होणार आहे.
दर शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेतले आहेत. त्यानुसार पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी असून तोपर्यंत अटकेपासून देखील खडसे यांना दिलासा देण्यात आलाय. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या जामीन अर्जावरही आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याबाबत कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे. ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी सुरू केली होती. खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या जावयाविरोधात भूखंड प्रकरणात काही पुरावे हाती लागले होते. आणखी एका प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांचाही सहभाग असल्याचे समोर आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलेले अंतरिम संरक्षण 21 डिसेंबरपर्यंत वाढवले आहे. मंदाकिनी यांचा ताबा द्यावा अशी मागणी होत असतानाच त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 21 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS