Homeताज्या बातम्याशहरं

लोकसभेच्या सर्वच जागा काँग्रेस लढवणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूट पाडली. हे सामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाही. मोदी सरकारच्या विरोधा

पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी
सातारा जिल्ह्यातील वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट
माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूट पाडली. हे सामान्य कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाही. मोदी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी करु, जे बरोबर येतील त्यांना सोबत घेवू अन्यथा काँग्रेस 48 जागांवर निवडणुका लढवणार असल्याचे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
ते वाळवा आणि शिराळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आ. विश्‍वजीत कदम, माजी आ. मोहनराव कदम, आ. विक्रमसिंह सावंत, जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पवार, शाकीर तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, अद्याप लोकसभा निवडणुकांना अवकाश असला तरी लोकसभा मतदार संघात आढावा सुरु आहे. काँग्रेस विचारांची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहते. आपल्यातील नाराज का गेले याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील जे आमदार फुटले ते ईडी व मोठ्या पदाच्या आशेने गेले. त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. जे येतील त्यांना समवेत घेणार आहे. शरद पवार हे काही दिवसात बाहेर पडणार असून पक्षासोबत कोण बरोबर आहे ते दाखवून देवू असे त्यांनी सांगितल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
आ. विश्‍वजीत कदम म्हणाले, राज्यात काँग्रेसमधील कोणीही आमदार फुटला नाही. सध्या जे सुरु आहे त्याला सामान्यांचा विरोध दिसतो. समाज मनात राजकारणातील फोडाफोडीबाबत संताप आढळून येतो हे संपर्क दौर्‍यात दिसते. वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचा मोठा संघर्ष दिसतोय. इस्लामपूरातील पक्ष कार्यालया संदर्भात कार्यकर्त्यांच्या पाठिशी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस आहे. लोकसभा मतदार संघात हे दोन्ही तालुके महत्वाचे असून शिराळा थोडा कमकुवत दिसत असला तरी त्यांनाही ताकत देवू.
आ. विक्रमसिंह सावंत म्हणाले, काँग्रेसची ताकत मोठी आहे. पुन्हा आपण संघटीतपणे 1980 चे सुवर्ण युग पक्षाला मिळवू देवू.
जितेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अ‍ॅड. रवि पाटील, संदीप जाधव, मनिषाताई रोटे, राजेंद्र शिंदे, नंदकुमार कुंभार, अ‍ॅड. आर. आर. पाटील, किरण चव्हाण, प्रा. हेमंत कुरळे, जयदीप पाटील, आनंदराव पाटील, रंजना माळी, अर्जुन खरात, उदय थोरात आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS