Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दंत चिकित्सा शिबीराचा 51 रुग्नानी घेतला लाभ

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः रोटरी क्लब, श्रीरामपूरच्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबीरात 51 रुग्नांची तपासणी करण्यात आली. तर 5 शिबीरार्थीचे कवळीसाठी माप

गणेश कारखान्यासाठी शेतकरी संघटना मैदानात
मांडओहळ धरण सलग तिसऱ्या वर्षी ‘ओव्हर फ्लो’
संभाजी महाराज जयंतीनिमित्त सावेडी उपनगरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः रोटरी क्लब, श्रीरामपूरच्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबीरात 51 रुग्नांची तपासणी करण्यात आली. तर 5 शिबीरार्थीचे कवळीसाठी मापे घेण्यात आली असुन, त्यांना लवकरच मोफतच कवळी दिली जाणार आहे. असे रोटरी क्लबचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे यांनी सांगितले.
रोटरी क्लब, श्रीरामपूर व डॉ.घोगरे डेंटल क्लिनीक तसेच श्रीरामपूर गुजराथी समाज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डिवाईन चॅरीटेबल ट्रस्ट, राजकोट यांच्या सहकार्याने मोफत दंत चिकित्सा शिबीराचे गुजराती मंगल कार्यलायत आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला भारतातील सुप्रसिध्द दंत वैद्य डॉ.जयसुख मकवाणा तसेच सहयोगी स्टाफ डॉ.संजय अग्रवाल,डॉ.मोनीका भट्ट आणि डॉ.जागृती चौव्हाण यांच्या सहकार्याने आयुर्वेदच्या जालंधर बंध योगविद्या द्वारा विना इंजेक्शन,विना औषध, विना भुल, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, हलत असलेले, दुखत असलेले दात व दाढ आल्हादपणे काढले गेले. दातांच्या प्रत्येक रोगावर नि:शुल्क उपचार व सल्ला. कवळी (बत्तीसी) मध्ये तयार करुन देण्यात येणार आहे. देण्यात येणा्र्‍या पाच कवळी या दंतवैद्य डॉ.अजित घोगरे यांच्या वतीने दिल्या जाणार आहेत.
या शिबीराचे उद्घाटन भारतातील सुप्रसिध्द दंत वैद्य डॉ.जयसुख मकवाणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुजराती समाजाचे नारायणभाई पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे, सेक्रटरी रवी निकम,खजिनदार विनोद पाटणी,उद्धव तांबोळी,विशाल कोटक , अनिल पांडे, ऋषिकेष बनकर पाटील, अभिजित मुळे, डॉ.अजित घोगरे, उल्हास धुमाळ, निलेश नांगले,मन्नुभाई ठक्कर, यांच्यासह शिबीरार्थी व रोटरी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे यांनी केले तर आभार सेक्रटरी रवी निकम यांनी मानले

COMMENTS