Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याला काँग्रेसचा विरोध

मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसने विरोध केलाय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाव

पावसाचे पाणी साठवा-विषयक कार्यशाळा उत्साहात
पेठ नाक्यावर सोळा लाखांचे कोकेन पकडले; नायजेरियन तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी
नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग

मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसने विरोध केलाय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळुरूत छत्रपतींचा पुतळा बसवू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.


मंगळुरू येथील महावीर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी मराठा संघटनेच्या मागणीवरून मंगळुरू महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मंगळुरू नगरपरिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते नवीन डिसोझा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीने (एमईएस) कर्नाटकच्या विरोधात काय बोलले याकडे सदस्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, एमईएस महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असताना मंगळुरूमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य आहे. काँग्रेसचे सदस्य शशिधर हेगडे म्हणाले की, किनारी भागातील स्वातंत्र्यसैनिक आणि यश मिळविणार्यांपैकी कोटी-चेन्नया यांचा दोघांचा पुतळा बसवायचा पाहिजे. शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नये, असे पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितले. नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच असताना परिषदेचे मुख्य व्हीप प्रेमानंद शेट्टी यांनी हा प्रस्ताव यापूर्वीच गेल्या सभेत मंजूर करून विरोधकांचे आक्षेप नोंदवण्यात आल्याचे सांगितले. हिंदू आदर्शांना काँग्रेस नेहमीच विरोध असल्याचा आक्षेप भाजपच्या नगरसेवकाने नोंदविला. महाराष्ट्र एकीकरण समितीचा कर्नाटकला विरोध असल्याच्या कारणावरून मंगळुरू शहर कॉर्पोरेशन काऊन्सीलचे विरोधी पक्षनेते नवीन डिसोझा यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास विरोध केल्याचे कारण सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समिती कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असताना शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू आहे. बेळगाव महाराष्ट्रात यावे, अशी महाराष्ट्राची मागणी आहे. या मागणीला कर्नाटकचा विरोध आहे.

COMMENTS