Homeताज्या बातम्यादेश

मोदी सरकार भ्रष्टाचाराच्या विळख्यात

सहा योजनांमध्ये घोटाळा झाल्याचे कॅगचे ताशेरे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः मुळातच काँगे्रसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवर आलेले मोदी सरकारच भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

PFI च्या नावे भाजप आमदारास धमकीचे पत्र
भारत-कॅनडा संबंधात वितुष्ट
नगर अर्बन बँकेला चुकते करावे लागणार डिपॉझीट गॅरंटीचे पैसे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः मुळातच काँगे्रसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवर आलेले मोदी सरकारच भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ना खाऊँगा, ना खाने दुँगा, अशी भूमिका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता संशयाच्या फेर्‍यात अडकले आहेत. मोदी सरकारचे महत्वाकांक्षी असणारे प्रकल्प भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सहा योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत.

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी जोमाने करण्यात येत आहे. तर विरोधकांना महागाई, बेरोजगारी इत्यादी जनतेशी निगडित प्रमुख मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्यात विरोधी पक्षांना आतापर्यंत अपयश आले असतांना, विरोधकांच्या हाती भ्रष्टाचारावरून सरकारला घेरण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे विरोधक सरकारविरोधात आ्रकमक होण्याची शक्यता आहे. कॅगचा अहवाल आल्यानंतर आणि या अहवालात अनेक योजनांमधील घोटाळ्यावर प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर आता सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी काँग्रेसला मोठा मुद्दा मिळाला आहे. या अहवालावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी उपरोधिकपणे टीका करतांना म्हटले आहे की, एक संस्था प्रामाणिक पंतप्रधानांना भ्रष्ट म्हणत आहे. यावर पंतप्रधानांनी कठोर कारवाई करावी. याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांना पाठवुन धडा शिकवला पाहिजे. पीएम मोदींची प्रतिमा मलिन करणार्‍या या संस्थांना देशद्रोही ठरवावे, त्यांना तुरुंगात टाकावे असे म्हटले आहे. सात घोटाळ्याचा रिपोर्ट देण्याची कॅगची हिंमतच कशी झाली? अडीचशे कोटीचे 1800 कोटी कसे झाले? असा कोणता चमत्कार घडला? असा चिमटा काढतानाच कॅगने टोल प्लाझाचे ऑडिट केले. त्यात 132 कोटी रुपयांची लूट करण्यात आल्याचे म्हटले आहे, असा दावाही श्रीनेत यांनी केला आहे.

चुकीच्या लोकांना दिले कंत्राट – आयुष्यमान भारत योजनेत साडे सात लाख लोकांनी एकाच नंबरने रजिस्ट्रेशन केले होते. 88 हजार मृतांच्या नावाने क्लेम करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर होत आहे. विकासाच्या प्रकल्पात प्रचंड घोटाळा झाला आहे. सिंचन विभागने चुकीच्या लोकांना कंत्राट दिले. ग्रामविकास मंत्रालयात घोटाळा झाला आहे. एक रस्ता बनवण्यासाठी प्रति किलोमीटरसाठी 18 कोटींची मंजुरी देण्यात आली. मात्र, नंतर कोणत्याही मंजुरीशिवाय हाच रस्ता 251 कोटी खर्चून बनवला आहे. हा एवढा मोठा घोटाळा आहे, असा दावा आपच्या नेत्या प्रियंका कक्कड यांनी केला आहे.

कॅगच्या अहवालानुसार याप्रकल्पात घोटाळे – आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचारा दरम्यान मृत झालेल्या 88 हजार रुग्णांचे बिल पास केले.
भारतमाला प्रकल्पाचा खर्च 15.37 कोटी रुपयांववरून 32 कोटी दाखवण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ 5 टोलनाक्यांवर 132 कोटींची वसुली
आयुष्यमान भारत योजनेत 7.5 लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल नंबर वरून नोंद
अयोध्या विकास प्रकल्पात कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन राम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विक्री करण्यात आली.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्पात सदोष इंजिन विकसित केल्यामुळे 154 कोटींचे नुकसान
द्वारका एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रति किलोमीटर 18 कोटींवरून 250 कोटींवर दाखवला.

COMMENTS