Homeताज्या बातम्यादेश

जीएसटी करातून 1 लाख 45 हजार 867 कोटीच्या महसूलाचे संकलन

गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 टक्क्यांहून अधिक वाढ

नवी दिल्ली- 01 डिसेंबर (हिं.स.) : चालू आर्थीक वर्षात (2022-23) नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) 1 लाख 45 हजार 867 कोटी रुपये

पोलीस निवासस्थानांच्या दुरावस्थेचा प्रश्न आ. नमिता मुंदडांनी मांडला विधीमंडळात
ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव
रास्ता रोको करणार्‍या स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

नवी दिल्ली– 01 डिसेंबर (हिं.स.) : चालू आर्थीक वर्षात (2022-23) नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) 1 लाख 45 हजार 867 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर्षीचा जीएसटी 1,45,867 कोटी रूपये आहे. त्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) 25,681 कोटी, राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) 32,651 कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) 77,103 कोटी (त्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले 38,635 कोटी रुपयांचा समावेश आहे) आणि 10,433 कोटी रूपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 817 कोटींसह) सेस अर्थात उपकर आहे. सरकारने नियमित सेटलमेंट म्हणून आयजीएसटीमधून 33,997 कोटी रूपये सीजीएसटीला आणि 28,538 कोटी रूपये एसजीएसटीला दिले आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 59678 कोटी आणि एसजीएसटीसाठी 61189 कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने नोव्हेंबर 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून 17 हजार कोटी जारी केले होते. नोव्हेंबर 2022 चा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 11 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा महसूल 1,31,526 कोटी रूपये होता. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल 20 टक्के जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात मिळालेल्या महसुलापेक्षा 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

COMMENTS