Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली लोकसभेच्या 7 जागांवर काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली ः 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. काँगे्रस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन ख

दिव्यांग बांधवांसाठी आयोजित रक्षाबंधन उत्साहात
उमेदवारांची यादी जाहीर होताच कर्नाटक भाजपमध्ये बंडाळी
गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांचा नकार; प्रवेशद्वारावर दिला बाळाला जन्म

नवी दिल्ली ः 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. काँगे्रस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्लीतील कार्यकर्त्यांना सर्व जागांसाठी सज्ज होण्यास सांगण्यात आले. चार तास चाललेल्या या बैठकीत चाळीस नेत्यांचा सहभाग होता. संपूर्ण बैठकीत दिल्लीत काँग्रेस मजबूत करण्यावर भर होता. बैठकीनंतर पक्षाच्या नेत्या अलका लांबा यांनी ही माहिती दिली. अलका लांबा म्हणाल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर लोकांचा काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या बैठकीत आप नेत्यांवरील खटल्यांवरही चर्चा झाली.

COMMENTS