Homeताज्या बातम्यादेश

चांद्रयान-3 पासून विक्रम लँडर झाला वेगळा

23 ऑगस्टला चंद्रावर करणार लँडिंग

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोची महत्वाकांक्षी असलेली चांद्रयान-3 मोहीम लवकरच यशस्वी होण्याची चिन्हे असून, चांद

चांद्रयान-३ चं प्रेक्षपण जुलै महिन्यात होणार ?
इस्रो आज करणार चांद्रयान-3 प्रक्षेपण
चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोची महत्वाकांक्षी असलेली चांद्रयान-3 मोहीम लवकरच यशस्वी होण्याची चिन्हे असून, चांद्रयान 3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहचले आहे. तसेच, प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे विक्रम लँडर गुरुवारी वेगळे झाल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे.
आता विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने अंतिम प्रवास सुरु झाला असून, विक्रम लँडर हा यापुढचा प्रवास एकटाच करणार आहे. विक्रम लँडर 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतासाठी खूपच महत्वाचा राहणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 च्या चंद्राभोवतीच्या सर्व प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. शेवटची कक्षा 16 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी चांद्रयानचे आतापर्यंत प्रोपल्शन मॉड्यूलसह प्रवास करणारे विक्रम लँडर वेगळे झाले आहे. चांद्रयान 3 एक एक टप्पा यशस्वीरित्या पार करत चंद्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. आता चांद्रयानच्या विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेचा अंतिम प्रवास सध्या सुरु झाला आहे. 23 ऑगस्ट रोजी फक्त विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.25 वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. शास्त्रज्ञ टी.व्ही. वेंकटेश्‍वरन यांनी सांगितले की, रोव्हर लँडरच्या पोटात आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने आतापर्यंत पृथ्वीवरून लँडर आणि रोव्हरसह प्रवास केला आहे. इस्रो वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. पहिली म्हणजे लँडर मॉड्यूलचे इंजिन आणि इतर गोष्टी व्यवस्थित काम करत आहेत. वेगळे झाल्यानंतर लँडर त्याच्या पायावर उभा राहील म्हणजेच त्याची पूर्ण क्षमता आहे. दुसरे आणि महत्त्वाचे म्हणजे लँडर वेगळे झाल्यानंतर ते आता 23 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. दरम्यान, जी प्रक्रिया आता घडत आहेत किंवा घडणार आहेत. ती चांद्रयान-2 दरम्यान देखील यशस्वीरित्या पार पडली होती. त्यावेळीही लँडर वेगळे होऊन चंद्राच्या दिशेने निघाले होते. पण 2.1 किमीचे अंतर बाकी होते. त्यानंतर वेग नियंत्रित करता आला नाही आणि क्रॅश लँडिंग करण्यात आले होते. पण आता चांद्रयान 3 मोहिम यशस्वी होईल असा विश्‍वास इस्रोकडून व्यक्त केला जात आहे.

COMMENTS