Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी तालुक्यातील केळ सांगवी येथील ड्रॅगन फ्रूट,खजूर,सफरचंद बागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद

आष्टी प्रतिनिधी - बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील बीडसांगवी,केळसांगवी, निमगावचोभा,पिंपरखेड या गावांचा गुरुवारी (दि.

दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांचे दिवाळे
ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशनजवळ 25 ते 30 एकरातील ऊस आग
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणूकीचे वारे; राष्ट्रवादीच्या आमदारासह जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा अर्ज बाद

आष्टी प्रतिनिधी – बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील बीडसांगवी,केळसांगवी, निमगावचोभा,पिंपरखेड या गावांचा गुरुवारी (दि.6.2023) रोजी दौरा केला.यावेळी त्यांनी तालुक्यातील प्रगतशील शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतातील फळबागांची पाहणी करून शेतकरी व नागरीकांशी संवाद साधला.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या मोहिमेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामाचे उद्घाटन केले तसेच केळसांगवी येथे विजया घुले यांच्या सफरचंद लागवड ड्रॅगन फ्रुट व खजूर लागवड या बागेची पाहणी केली.निमगाव चोभा येथील सतिष झगडे यांच्या मनुके तयार करण्याच्या युनिटला भेट दिली तसेच पिंपरखेड येथे दादासाहेब गव्हाणे यांच्या शेतामधील जरबेरा शेतीची पाहणी केली.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,कृषी अधिकारी गोरख तरटे,मंडळ अधिकारी पांडुरंग माढेकर,मंडळ अधिकारी शरद शिंदे,मंडळ अधिकारी कदम,राठोड,जवजाळ, औंदकर,अनिल ठाकरे,अव्वल कारकून भगिरथ धारक,तलाठी अनारसे,आचार्य,पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या पहिल्यांदाच आष्टी तालुक्याच्या दौरावर आल्या परंतु आष्टीचे तहसिलदार विनोद गुंड्डमवार हे रजेवर तर नायब तहसिलदार शारदा दळवी व बाळदत्त मोरे हे संप असल्याने जिल्हाधिकारी यांच्या दिमतीला मंडळअधिकारी व तलाठ्यांनाच थांबावे लागले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील ग्रीनफिल्ड या रस्तामध्ये जाणार्‍या पारगांव,केळसांगवी या गावाला भेट देऊन,केळसांगवी येथील सफरचंदच्या बागेतही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली त्यानंतर त्या पिंपरखेड येथील पॉलिहाऊस ची पाहणी करून बीडकडे रवाना झाल्या. आष्टी तालुक्यातील काही तलाठी,मंडळ अधिकारी हे नियमित सज्जावर जात नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी दौर्‍या प्रसंगी केल्या असून जे महसूल चे अधिकारी कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा ही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिला.

COMMENTS