Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगरनांदुर येथे प्रति वर्षा प्रमाणे या वर्षी देखील यात्रा भरणार मोठ्या उत्साहात

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथील शहादावल मालीक हे जाज्वल्य व जागृत दैवत असुन शहादावल मालीक नावाने ओळखल्या जाणा-या या दर्गा

मुंबईमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू
सुनील पवार यांची रायगड जिल्हा पोलीस निवडी बद्दल सत्कार
पठाण फिल्मच्या निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी – राम कदम 

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील आगर नांदूर येथील शहादावल मालीक हे जाज्वल्य व जागृत दैवत असुन शहादावल मालीक नावाने ओळखल्या जाणा-या या दर्गाची महिमा आगर नादुर बरोबरच दुरवर पसरलेली असुन दुर दुरवरून सर्व धर्मिय भाविक भक्तगण या ठिकाणी सातत्याने हजेरी देत दर्शनास येत असतात. आगर नांदूर येथील पंचक्रोशीत हे दैवत सर्व धर्मिय व विविध समाज बांधवांत नावाजलेले व गाजलेले असुन प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाणार आहे. गावाच्या परंपरे नुसार, नियमितपणे एप्रिल महिन्यातील दिं 10/4/023 पासुन यात्रेला सुरुवात होणार आहे. दि. 10 रोजी. संध्याकाळी संदल मिरवणूक वाजवीत गाजवीत काढण्यात येणार आहे व दि.11छबीना मिरवणूक व शोभेची दारू उडवली जाणार तर, दि.12 ला कुस्त्या होणार आहेत.या गावातील परिसरातील पंचक्रोशीतीलच नव्हे तर बाहेर गावातील शहरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. कोरोना काळात विविध ठिकाणचे यात्रा उत्सव अडगळीत पडलेले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर असल्याने भाविक भक्तगणात अधिक ऊत्सहा दिसुन येत असुन या यात्रेचा आनंद व दर्शनाचा  लाभ नागरिकांनी घ्यावा आसे आव्हान संयोजकांनी केले आहे.

COMMENTS