Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निघोज कृषी फलोद्यान संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लामखडे

उपाध्यक्षपदी अमृताशेठ रसाळ यांची फेरनिवड

निघोज ः शेतकर्‍यांना पाठबळ देण्याचा विचार करुन निघोज कृषी फलोद्यान सहकारी संस्था स्थापन करणार्‍या बाबासाहेब कवाद यांच्या विचारांचे अनुकरण करीत सं

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणारा अटकेत
कर्जत नगरपंचायत मधील लाभार्थ्यांना 50 लाखांच्या हप्त्यांचे वितरण
त्या’ 6 खासगी सावकारांची पोलिस करणार चौकशी ?

निघोज ः शेतकर्‍यांना पाठबळ देण्याचा विचार करुन निघोज कृषी फलोद्यान सहकारी संस्था स्थापन करणार्‍या बाबासाहेब कवाद यांच्या विचारांचे अनुकरण करीत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी संस्थेचा नावलौकिक जिल्ह्यात केला असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी व्यक्त केले आहे.
निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चाबुकस्वार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी चंद्रकांत लामखडे यांची अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी अमृताशेठ रसाळ यांची बिनविरोध फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके , बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चाबुकस्वार यांचा नूतन अध्यक्ष चंद्रकांत लामखडे व उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, श्री पांडुरंग कृपा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके, उपाध्यक्ष दत्तात्रय गुंड, निघोज सोसायटीचे अध्यक्ष सुनिल वराळ, उपाध्यक्ष शांताराम लाळगे, माजी उपाध्यक्ष वसंत ढवण, माजी चेअरमन रामदास वरखडे, पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके,  पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, शिवशक्ती पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष खंडू लामखडे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, विश्‍वस्त विश्‍वासराव शेटे, ठकाराम लंके, विठ्ठलराव कवाद, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, संस्थेचे ज्येष्ठ संचालक दामुशेठ लंके, भाउ रसाळ तसेच सर्व स़ंचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे मार्गदर्शक कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके यांचे मार्गदर्शन तसेच बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच निघोज ग्रामीण संस्था परिवारातील सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ व कार्यकर्ते यांचे महत्वपूर्ण पाठबळ आम्हाला मिळाले असल्याने संचालक मंडळ व सभासद तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्थेचा विकास झाला असल्याची माहिती लामखडे व रसाळ यांनी दिली आहे. यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघ, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था, निघोज सोसायटी, लोकनेते निलेशजी लंके प्रतिष्ठान तसेच निघोज ग्रामीण संस्था परिवार, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, सभासद यांच्या वतीने नूतन अध्यक्ष चंद्रकांत लामखडे व उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व संचालक रामदास वरखडे यांनी केले शेवटी व्हा चेअरमन आमृता रसाळ यांनी आभार मानले.
 

COMMENTS