Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यत्वाची प्रचिती, हीच माणुसकीची संस्कृती ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ जीवनाचे चार स्तंभ आहेत. भारतीय संस्कृती ही अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठ आहे, या वाटेवर माणूस

डॉ. बाबुराव उपाध्ये यांना साहित्यभूषण पुरस्काराबद्दल गौरव  
दुर्गामातांचा डॉ. महांडुळे यांनी केलेला सन्मान स्त्रीशक्तीचा उत्सव ः डॉ. बाबुराव उपाध्ये
’बाबुराव पासष्टी’ निमित्त्त डॉ. जगताप यांनी दिलेली गुरुदक्षिणा मौलिक ः डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर ः धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ जीवनाचे चार स्तंभ आहेत. भारतीय संस्कृती ही अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठ आहे, या वाटेवर माणूसच माणसाला बळ आणि प्रतिष्ठा देतो. यानुषंगाने स्व. एन.डी. कुलकर्णी आणि स्व. नलुताई कुलकर्णी यांनी माझ्या पोरक्या वाटेवर मला आधार दिला,शिक्षणाला लावले, माणुसकी दाखविली अशी व्यक्तिमत्वे म्हणजे दिव्यत्वाची प्रचितीच आहे आणि येथेच माणुसकीची खरी संस्कृती आहे,असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
  श्रीरामपूर येथील रामकृष्णनगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात कुलकर्णी परिवाराने श्रीगजानन महाराज प्रकटदिन कार्यक्रम मंदिरत आयोजित केला होता, त्याप्रसंगी दर्शनसोहळा आणि कुलकर्णी परिवाराच्या सेवाभावविषयी मत व्यक्त करताना डॉ.बाबुराव उपाध्ये बोलत होते. प्रारंभी पुरोहित अभय कुलकर्णी यांनी श्रीगजानन महाराज मंदिराची आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी कुलकर्णी परिवाराचे मोठेपण आणि आठवणी सांगितल्या. स्व. एन.डी. कुलकर्णी हे अशोकनगर साखर कारखान्यात होते. कुलकर्णी यांचे सुकळे परिवारावरील ऋण सांगितले.1996 च्या मंदिर स्थापनेपासून कुलकर्णी परिवाराचे रामकृणनगर परिसरावर असलेले संस्कार सांगितले. शेगाव संस्थानचे स्व. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या आठवणी सांगितल्या. डॉ. उपाध्ये यांनी उंदीरगाव येथे असताना कुलकर्णी परिवारामुळेच आपले शिक्षण कसे झाले ते सांगितले. छल्लाणी परिवार, घोडे परिवार, देशमुख परिवारांच्या  आठवणी सांगून अशी देवमाणसं भेटली म्हणूनच आपले जीवन आकाराला आले त्याविषयी डॉ. उपाध्ये यांनी आठवणी सांगून भावदर्शन घेतले. यावेळी संकेत बुरकुले, सतिश पाटील गवारे, अजय कुलकर्णी आदिसह भक्तगण उपस्थित होते. गेल्या40 वर्षापासून हा धर्मउत्सव सुरु असून गवारे पाटील परिवार, बकाल परिवार व परिसरातील सर्वांचे सहकार्य लाभते असे सांगून पुरोहित अभय कुलकर्णी यांनी माहिती देऊन आभार मानले.

COMMENTS