Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज

ग्रामीण भागात मजुरांच्या हातांना कामे नसल्याने मोठ्या शहराकडे

नांदेड - सध्या नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या  1 हजार कामावर दहा हजारहुन अधिक मजूर काम कर

रत्नागिरी – नागपूर महामार्गांवर बोलेरो आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
लोक म्हणाले पिऊन पडलाय, त्याने ओळखलं पोलिसाला हार्ट अटॅक आलाय
निराधार योजनेचा नाही आधार

नांदेड – सध्या नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या  1 हजार कामावर दहा हजारहुन अधिक मजूर काम करत आहेत .परंतु उन्हाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागात शेतकर्‍यांवर शीत मजद्वारांना कामे नसल्यामुळे येथील मजूर मोठमोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. औरंगाबाद पुणे मुंबई हैदराबाद अशा मोठ्या शहराकडे ज्या ठिकाणी औद्योगिक कारखाने जास्त आहेत त्या शहराकडे ग्रामीण भागातील शेतमजूर कष्टकरी जात आहेत. रोजगार मिळाला पाहिजे हा शासनाचा मूळ उद्देश असताना ग्रामीण भागात काही फाटक्या राजकीय    पुढार्यांचा  हस्तक्षेप होतो त्यामुळे रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविल्या जात नाही ही वस्तुस्थिती आहे सध्या बहुतांश कामे यंत्रणेद्वारे होत असल्यामुळे मजुराच्या हाताला काम नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहाव्यास मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात उत्पादन कारखाने कमी असल्यामुळे नांदेड शहरात सुद्धा मजुरांना का मिळत नाही अशी गंभीर परिस्थिती आहे.  ग्रामपंचायती द्वारे 908 कामे सुरू असल्यामुळे आठ हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. सध्याला ग्रामीण भागात दहा हजार मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात निम्म्यापेक्षा जास्त स्त्री मजूर असल्याचे प्रमाण आढळून येत आहे .लोहा. कंधार , अर्धापूर, भोकर ,किनवट ,माहूर मुखेड या तालुक्यात  अर्ध्या पेक्षा जास्त महिला मजूर रोजगार हमीच्या कामावर आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी जानेवारी महिन्यातच विविध कामे सुरू केली जातात यामध्ये रस्ते. तलाव चितळे अधिक कामाचा समावेश आहे या कामावर सध्याला उच्चशिक्षित तरुण सुद्धा कामावर आहेत . रोजगार हमी योजनेवर काम असलेल्या मजुरांना बाजाराच्या दिवशी वेतनाची अत्यंत आवश्यकता असते परंतु प्रशासकीय यंत्रणेद्वारे मजुरांना वेळेवर पगार होणे शक्य नसते कागदपत्राची जुळवाजवळ करून वरिष्ठ विभागाकडून निधी प्राप्त करून घेतल्यानंतरच मजुरांना देयके अदा केली जातात अशी गंभीर परिस्थिती खेडेगावात आहे.या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जॉब कार्ड वितरित होणे आवश्यक आहे काही तांत्रिक अडचणीमुळे व ग्रामपंचायतील राजकारणामुळे अनेक मजुरांना जॉब कार्ड जाणीवपूर्वक वितरित करण्यात आले नाहीत. याकडे उपजिल्हाधिकारी यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

COMMENTS