Homeताज्या बातम्यादेश

चंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन मंजूर

हैदराबाद ः कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात 52 दिवस तुरुंगात राहिलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना चार आठवड्यांचा अंतरिम जा

पाणीटंचाईचे संकट
क्षेपणास्त्र ‘अग्नी पी’ची यशस्वी चाचणी
पोलीस निरीक्षकाची दादागिरी नागरिकाला बंद खोलीत लाथा बुक्यांनी मारहाण.

हैदराबाद ः कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात 52 दिवस तुरुंगात राहिलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील वकील सुनाकारा कृष्णमूर्ती यांनी ही माहिती दिली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चंद्राबाबू नायडू यांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे. नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी कौशल्य विकास घोटाळ्यात नांदयाल येथून अटक करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना 4 आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. नायडू यांना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती सुंकारा कृष्णमूर्ती यांनी दिली. हे प्रकरण कौशल्य विकास महामंडळशी संबंधित आहे. नायडू यांनी निकषांचे पालन न करता निविदा प्रक्रिया सुरू केली. यासाठी त्यांनी मत्रिमंडळाची मान्यताही घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे आंध्र प्रदेश सरकारचे सुमारे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणात नायडू मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप राज्य पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केला आहे. सीआयडीने नायडू यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत.

COMMENTS