Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पाऊस असे चक्र सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा राज्या

इच्छामरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचे ‘सर्वोच्च’ संकेत
माहीतीचा कायदा दुर्लक्षित होतोय ! 
Liger च्या अपयशानंतर सहनिर्मातीनं सोशल मीडियाला ठोकला रामराम

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पाऊस असे चक्र सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती, बुलढाणा, वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबई हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी 04.00 वाजता जारी केलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या भागात 30 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.तसेच निर्जन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

COMMENTS