Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकरांसह गुन्हा दाखल

जम्बो कोविड सेंटर प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या प्रकरणात निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता बनावट भागिदारीचे डीड तयार करून निविदा मंजूर केल्याप्रकर

शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या प्रकरणात निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता बनावट भागिदारीचे डीड तयार करून निविदा मंजूर केल्याप्रकरणी संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा परिचरलणेसाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता हा घोटाळा केल्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
या प्रकरणाविषयी संजय राऊतांना पत्रकार परिषदेतही प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर मला माहित नाही असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या फर्मल जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार केले. ही निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पुढील तपास करत आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीएचे अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर भादवी कलम 420, 426, 465, 467 ,468, 471, 511 ,34 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2020 ते 9 सप्टेंबर 2020 यादरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सयाजीराव गायकवाड भवन, पुणे आणि जम्बो कोविड सेंटर सीओपी ग्राउंड शिवाजीनगर पुणे याठिकाणी घडलेली आहे. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता. या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात 80 कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केले, 20 कोटींचे दुसरे करत आहे.असा दावा सोमय्यांनी केला होता.

कोण आहेत सुजीत पाटकर – सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपाला संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचे म्हटले होते. ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावे होती. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे.’ असे सुजीत पाटकर म्हणाले होते.

COMMENTS