Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा परीक्षा कामांवर बहिष्कार

विविध मागण्यासाठी देशमुख महाविद्यालयातील कर्मचारी आक्रमक

अकोले/प्रतिनिधी ः राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि. 2 फेब्रु 2023 पास

शिंदे-फडणवीसांच्या काळात औद्योगिक वीज वापर वाढला
घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’ संभाजीराजेंचं आवाहनl पहा LokNews24
मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.

अकोले/प्रतिनिधी ः राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार दि. 2 फेब्रु 2023 पासून परीक्षा कामकाजावर बहिष्काराचा निर्णय घेऊन राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे होऊ घातलेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी 20 फेब्रु 2023 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे. अशी माहिती महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वैभव रोडी व सचिव संतोष कानडे यांनी दिली.

राजूर येथील अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्राचार्य, डॉ. बी.वाय. देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आज 2 फेबु्रवारीपासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येत आहे, 14 फेब्रवारी  रोजी दुपारी 2 ते 2-30 या काळात निदर्शने करण्यात येणार आहे. तसेच 15 फेब्रवारी रोजी काळ्या फिती लावून परीक्षा व्यतिरिक्त कार्यालयीन काम करणार असून, 16 फेबु्रवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत. 20 फेब्रवारी पासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात सुधारित सेवाअंतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित  सेवाअंतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पूर्ववत  लागू करणे. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10-20-30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लागू करणे.

सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे. आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. म्हणून या प्रमुख मागण्यांबाबत मा.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तोडगा न काढल्यास सेवक संयुक्त कृती समितीमार्फत व महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांचे आदेशान्वये वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे होऊ घातलेल्या सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकतील.  तसेच त्यानंतरही या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी   दि. 20 फेब्रुवारी, 2023 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करतील असा इशारा दिला.

COMMENTS