Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशमध्ये बॉम्ब बनवतांना स्फोट

अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहातील घटना

अलाहाबाद ः उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात बॉम्ब बनवत असतांना झालेल्या स्फोटात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची धक्कादाय

सुंदरगडावर श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन
मोदी सरकारकडून जनतेची पिळवणूक : आ. पृथ्वीराज चव्हाण
नगर शहराचे महत्व पर्यटन विभागाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविणार :आदिती तटकरे

अलाहाबाद ः उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात बॉम्ब बनवत असतांना झालेल्या स्फोटात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी उघडकीस आली आहे. बॉम्ब बनवणार्‍या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून बॉम्ब नेमका कशासाठी बनवत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे.
या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबाद विद्यापीठाचा एमएचा विद्यार्थी प्रभातयादव पीसी बॅनर्जी वसतिगृहाच्या खोलीत बॉम्ब बनवत होता. यादरम्यान अचानक मोठा बॉम्बचा स्फोट झाला. यात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सोबत असलेला दुसरा विद्यार्थीही जखमी झाला आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा विद्यार्थी वसतिगृहात स्वयंपाक बनवताना हा स्फोट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान हा विद्यार्थी बॉम्ब कशासाठी बनवत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच जखमी विद्यार्थ्याला एसआरएन रुगणालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS