Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवणार : ना. सत्यपालसिंह बघेल

मित्र पक्षांच्या विजयात भाजपचा वाटा : यापुढे मतदार संघात कोणतीही चूक होणार नाहीइस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा काला

शाम्पूपासून कॅन्सरचा धोका; जॉन्सननंतर युनिलिव्हर कंपनी अडचणीत
सातार्‍यातील युवकास खून प्रकरणात जन्मठेप
महाबळेश्‍वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा : ना. शंभूराज देसाई

मित्र पक्षांच्या विजयात भाजपचा वाटा : यापुढे मतदार संघात कोणतीही चूक होणार नाही
इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी असून या अगोदर मित्र पक्षांना बरोबर घेवून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या विजयात भाजपचा वाटा आहे. सध्या कोणतेही पक्षासोबत युती करताना तो सोबत राहिल याबाबत साशंकता निर्माण होते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे तर पंजाबमध्ये अकाली दलाने आमची साथ सोडली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत कोणतीही चूक करणार नाही. यापुढे भाजपाचा विचार तळागाळात पोहचवण्यासाठी व हातकणंगले मतदार संघात भाजपला ताकद देणार असल्याची माहिती केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पत्रकार परिषदेस खा. संजय पाटील, आ. गोपीचंद पडळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजित देशमुख यांची उपस्थिती होती.
ना. बघेल म्हणाले, हातकणंगले मतदार संघात यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व शिवसेनेचे खा. धयैशील माने निवडून आले होते. यांना निवडून आणण्यात भाजपचा मोठा वाटा होता. त्यावेळी ते मित्र पक्ष म्हणून भाजप बरोबर होते. यापुढे या मतदार संघात भाजपला ताकद देणार आहे. पश्‍चिम बंगालमधील दोन मतदार संघ व महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. हा मतदार संघ मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचल्या की नाहीत, याची पडताळणी करत आहे. त्याच बरोबर भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी बुथ कमिटी अध्यक्ष, कोअर कमिटी, युवा मोर्चा यांच्याबरोबर चर्चा व त्यांचे प्रश्‍न ऐकून घेवून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार संपवला.
उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या न्यायालयीन प्रकरणाच्या प्रश्‍नावर उत्तर देताना बघेल म्हणाले, कोणी कोणासोबत जावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यावरील निर्णय न्यायालयीन बाब आहे. येत्या काही दिवसात तो ही प्रश्‍न सुटेल. हातकणंगले मतदार संघात विकासाच्या दृष्टीने कोणत्या कामांची गरज आहे. तसेच सांगली-पेठ रस्त्याच्या बाबतीत खासदारांना घेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून लवकरच या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS