Homeताज्या बातम्यादेश

हवाई वाहतूकीत भारत जगातील तिसरी मोठी बाजरपेठ – पंतप्रधान मोदी

पणजी/वृत्तसंस्था ः  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 70 वर्षांत देशातील विमानतळांची संख्या फक्त 70 होती आणि विमान प्रवास मोठ्या शहरांपुरता मर्याद

मोदी मित्रांच्या खिश्यात देश घालायला निघालेत
मोदींना हिरोची उपमा… ‘या’ क्रिकेटरने केले कौतुक…
मोदींचे राजकारण सूडाचे नव्हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाचेच !

पणजी/वृत्तसंस्था ः  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 70 वर्षांत देशातील विमानतळांची संख्या फक्त 70 होती आणि विमान प्रवास मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता. मात्र आता सरकारनं दोन स्तरांवर काम केलं. प्रथम विमानतळांचं जाळं देशभर विस्तारलं आणि दुसरं सामान्य नागरिकांना उडान योजनेद्वारे विमान प्रवासाची संधी मिळाली. या आधीच्या 70 वर्षांमधील 70 विमानतळांच्या तुलनेत गेल्या 8 वर्षांत 72 विमानतळे उभारले गेली आहेत. याचाच अर्थ देशात विमानतळांची संख्या दुपटीनं वाढली आहे. शिवाय, 2000 मध्ये असलेल्या फक्त 6 कोटी प्रवाशांच्या तुलनेत 2020 मध्ये (कोरोनासाथीच्या अगदी आधी) हवाई प्रवाशांची संख्या 14 कोटींहून अधिक झाली. उडान योजने अंतर्गत 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला. या उपायांमुळे भारत विमान वाहतुकीची जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


गोव्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. या विमानतळाची पायाभरणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नोव्हेंबर 2016 मध्ये केली होती. सुमारे 2870 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेला हा विमानतळ, शाश्‍वत पायाभूत सुविधा या संकल्पनेवर आधारित आहे. यात, सौरऊर्जा प्रकल्प, हरित इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र- ज्यात पुनर्प्रक्रिया सुविधाही आहे, अशा सगळ्या सुविधा यात देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला, विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात, प्रतिवर्ष 4.4 दशलक्ष प्रवासी क्षमता असेल. त्यानंतर याचा 33 दक्षलक्ष प्रवाशांपर्यंत विस्तार करता येईल. यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी प्रथम, मोपा इथे सुरु झालेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाबद्दल गोव्याच्या नागरिकांचे अभिनंदन केले. गेल्या आठ वर्षात गोव्याला दिलेल्या भेटींचे स्मरण करत पंतप्रधानांनी, गोव्याच्या नागरिकांनी त्यांच्यावर दाखवलेले प्रेम आणि स्नेहाचा उल्लेख केला. गोव्याचा विकास करुन, या प्रेमाची परतफेड करु, असं पंतप्रधान म्हणाले. हे विमानतळ म्हणजे, गोव्याच्या जनतेने केलेलं प्रेम आणि आशीर्वाद यांची परतफेड करण्याचा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले. या विमानतळाला गोव्याचे सुपुत्र सदिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

COMMENTS