Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर घटनेचा बेलापूरात विविध संघटनानी केला निषेध

बेलापूर ः बदलापूर येथील घटनेचा बेलापुरातील विविध संघटना तसेच गावातील युवकांनी काळ्या फिती लावून जाहीर निषेध केला तसेच आरोपीवर दाखल केलेला खटला जल

नगरला सेक्स रॅकेटचे ग्रहण?… त्या महिलेचा पर्दाफाश करा
कर्जतमध्ये संत बसवेश्वर जयंती उत्साहात  
आमदार आशूतोष काळे यांनी पाच कोटी बाबत दिशाभूल करू नये- उपनगराध्यक्ष कुरेशी

बेलापूर ः बदलापूर येथील घटनेचा बेलापुरातील विविध संघटना तसेच गावातील युवकांनी काळ्या फिती लावून जाहीर निषेध केला तसेच आरोपीवर दाखल केलेला खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. आपल्या परिसरात अशा घटना घडू नये याकरीता पोलिस प्रशासनाने शाळा कॉलेजमधुन गस्त वाढवावी तसेच शाळा कॉलेजमध्ये तक्रारपेटी बसविण्यात यावी जेणेकरुन अशा घटनाना आळा बसेल अशीही मागणी करण्यात आली. या वेळी बेलापुर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक विक्रम नाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, रफीक शेख, पत्रकार देविदास देसाई, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, विशाल मेहेत्रे, मयुर खरात, अक्षय नाईक, कैलास औटी, राफीक शहा, नितीन अमोलीक, गौरव वाकडे, रोहन शेलार, शहानवाज सय्यद, दीपक पुंड, अजय वायदंडे, तौफीक शेख,आमोल जाधव, योगेश काळे, किरण अमोलिक, सोनु शेलार, कुमार फुलमाळी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते 

COMMENTS