मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) यंदा रेपो दरात पाचव्यांदा वाढ केली. आरबीआयने रेपो दरात 0.35 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) यंदा रेपो दरात पाचव्यांदा वाढ केली. आरबीआयने रेपो दरात 0.35 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांहून 6.25 टक्के होणार आहे. त्याचा मोठा फटका देशातील कर्जदारांना बसणार आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जदारांना ईएमआयपोटी जादा रक्कम खर्च करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पतधोरण समितीच्या अहवालानंतर रेपे दरात वाढीची घोषणा केली.
आरबीआय पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आरबीआयने मे महिन्यात अचानक रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर तीन वेळा रेट रेपोमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या रेपो दर 6.25 टक्क्यांवर आला आहे. गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्ज महाग होणार आहेत. बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून महाग दराने कर्ज मिळू शकते. कर्जदारांना पूर्वीपेक्षा जास्त मासिक हप्ता भरावा लागेल. रेपो रेट हा अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. ज्याच्या आधारावर बँका किंवा इतर वित्तीय संस्था सामान्य लोकांना दिलेल्या कर्जावर व्याजदर ठरवतात. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात वाढ केल्यास, बँका सर्व प्रकारच्या कर्जांवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज आकारतात. जर रेपो दरात कपात झाली तर बँका कर्जावरील व्याजदरात कपात करतात. यामुळेच गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर पूर्वीपेक्षा कमी-जास्त व्याज द्यावे लागते.आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर आरबीआयने रेपो दर 0.35 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे.
COMMENTS