Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॉम्बे हायकोर्टाचे नाव महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय करा : खासदार गोपाळ शेट्टी

मुंबई येथील उच्च न्यायालयचे नाव बॉम्बे हायकोर्ट ऐवजी महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय असे करावे, अशी मागणी उत्तर मुंबई भाजप खासदार गोपाळ शेट्टी यां

श्री स्वामीचे अनुभव | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav
शालेय मुले देशाची अर्थव्यवस्था समृद्ध करणारी संपत्ती ः जयंती कठाळे
यंदा 50 हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई येथील उच्च न्यायालयचे नाव बॉम्बे हायकोर्ट ऐवजी महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालय असे करावे, अशी मागणी उत्तर मुंबई भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभा हिवाळी अधिवेशनात केली आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र सरकारने बॉम्बे हायकोर्टचे नाव महाराष्ट्र उच्च न्यायालय असे करावे, असा निर्णय घेतला होता. पण हे आदेश कधीच लागू झाले नाही. त्यानंतर वर्ष 1995 ला बॉम्बे नाव बदलून मुंबई करण्यात आले, पण उच्च न्यायालयाचे नाव बॉम्बे हायकोर्टच राहिले. खासदार शेट्टी यांनी मागणी करताना सांगितले आहे की महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्र शब्द उपयोग करताना एक विशेष महत्त्व असते. महाराष्ट्र राज्याचे भाषा, परंपरा संस्कृती या अनुषंगाने बॉम्बे हायकोर्ट ऐवजी महाराष्ट्र उच्च न्यायालय केल्याने स्थानिक पातळीवर महाराष्ट्र शब्दाचे भाव व्यक्त होतात.

COMMENTS