पराभवानंतर शाहीन आफ्रीदीबाबत पाकिस्तानचे मोठे विधान.

Homeताज्या बातम्याक्रीडा

पराभवानंतर शाहीन आफ्रीदीबाबत पाकिस्तानचे मोठे विधान.

आफ्रिदी आता कधी मैदानात उतरणार, हेदेखील स्पष्ट झाले आहे .

पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने या सामन्यात न खेळू शकलेला वेग

तब्बल 8 वर्षांनी हुर्रे : कोळे येथील शर्यतीत सैदापूरची बैलगाडी पहिली
तरडगाव येथे आज धावणार बैलगाड्या
जयंत प्रिमियर कबड्डी लिगच्या पहिल्याच दिवशीच्या सामन्यांत खेळाडूंची रोमहर्षक चढाई

पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने या सामन्यात न खेळू शकलेला वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी(Shaheen Afridi) बाबत मोठे अपडेट्स दिले आहेत. त्यामुळे आफ्रिदी आता कधी मैदानात उतरणार, हेदेखील स्पष्ट झाले आहे. शाहिनने १० महिन्यापूर्वी झालेल्या या मैदानातील सामन्यात अचूक आणि भेदक मारा केला होता. त्यामुळेच पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आला होता. पाकिस्तानने यावेळी १४८ धावा केल्या असल्या तरी त्यांना अनुभवी गोलंदाजाची कमी यावेळी जाणवली. जर शाहिन आफ्रिदी या सामन्यात असला असता तर कदाचित वेगळे चित्र पाहायला मिळू शकले असते. शाहिनला जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो पूर्णपणे बरा झाला नसल्याचे सांगत पाकिस्तानने त्याला या स्पर्धेत न खेळवण्याचे ठरवले होते. पण तरीही शाहिन हा पाकिस्तानच्या संघाबरोबर युएईमध्येच आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी सांगितले की, डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे दुखापतीचे पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी तो लंडनला जात आहे .ज्यामुळे तो आशिया चषक स्पर्धेमधून बाहेर पडला. आफ्रिदी दुबईहून लंडनला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी शाहीन आफ्रिदी तंदुरुस्त असल्याचा विश्वास पाकिस्तानने व्यक्त केला आहे. तथापि, पीसीबी वैद्यकीय संघ त्याच्या पुनर्प्राप्ती स्थितीच्या आधारावर शोपीस कार्यक्रमासाठी त्याच्या उपलब्धतेवर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे.

COMMENTS