बीड प्रतिनिधी - शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि. 21 सप्टेंबर 2021 अन्वये राज्यातील ऊसतोड कामागार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे व
बीड प्रतिनिधी – शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि. 21 सप्टेंबर 2021 अन्वये राज्यातील ऊसतोड कामागार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे व जे सतत मागील तीन वर्षापासुन ऊसतोडणी करीत आहेत अशा ऊसतोड कामगारांची ग्रामसेवकाने (संबंधीत गावातील, वस्त्यांमधील, पाडयांमधील व इतर ) सर्वेक्षण करुन नोंदणी करावी असे निर्देश दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने बीड जिल्हा जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन वेबसाईट (हीींिीं://ूशिवाी.लेा) तयार केलेली असुन याव्दारे 37634 ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. दिनांक 06 जुलै 2023 रोजीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, बीड यांनी सर्व ऊसतोड कामगार यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनाचे लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी असणे आवश्यक आहे. तरी सर्व ऊसतोड कामगार यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करावी असे अवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.
COMMENTS