Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संस्थाने निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर

बीड मतदारसंघातील येवलवाडी, उमरद जहांगीर, रायमोहा देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळवुन दिला तर नारायणगड, कपिलधार, शहेंशाहवली दर्गा यांच्या उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू

बीड । प्रतिनिधी/ महाविकास आघाडीच्या काळात बीड मतदार संघातील आणि शिरूर तालुक्यातील जालिंदर देवस्थान येवलवाडी, आकरूर देवस्थान उमरद जहाँगीर, जगदंब

बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी-आ.संदीप क्षीरसागर
भिमाई माझी मायबाप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेशाहू महाराजांच्या विचारावरच माझी राजकीय कारकीर्द -आ.संदीप क्षीरसागर
प्रस्थापितांची सत्ता उधळून लावण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीला साथ द्या-आ.संदीप क्षीरसागर

बीड । प्रतिनिधी/ महाविकास आघाडीच्या काळात बीड मतदार संघातील आणि शिरूर तालुक्यातील जालिंदर देवस्थान येवलवाडी, आकरूर देवस्थान उमरद जहाँगीर, जगदंब देवस्थान रायमोहा या देवस्थानासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून ‘ब’ दर्जाचे देवस्थान म्हणून दर्जा प्राप्त करून घेतला. तसेच आता श्री क्षेत्र नारायणगड संस्थान, श्री क्षेत्र मन्मथ स्वामी संस्थान कपीलधार व शहरातील शहेंशाहवली दर्गा या मंजूर झालेल्या तीर्थक्षेत्रासाठी उर्वरित निधी करिता पाठपुरावा सुरू असून भविष्यात बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानासाठी निधी आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू असून याकरता मी कटिबद्ध आहे असे वक्तव्य येवलवाडी येथे श्रीक्षेत्र संस्थान जालिंदर महाराज तसेच हिवरसिंगा येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराज संस्थान येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या भेटी दरम्यान व्यक्त केले.
आज येवलवाडी येथील सप्ताह निमित्त आज जालिंदर महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आ.संदीप क्षीरसागर यांनी सुप्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य हभप.विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांचे कीर्तनाचा लाभ घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार फंडातून 25 लक्ष रुपयांच्या सभागृहाचे भुमिपुजन केले. तसेच हिवरसिंगा येथील संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या मंदिराच्या कळस भरणीची भूमिपूजन केले. याप्रसंगी आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड मतदार संघातील येवलवाडी येथील जालिंदर महाराज संस्थान, उमरद जहागीर येथील आकुर्डी महाराज संस्थान, जगदंब देवस्थान रायमोहा तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा करून ‘ब’ दर्जाचे संस्थान म्हणून या देवस्थानास मान्यता प्राप्त करून घेतली असून भविष्यात बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील देवस्थानाकरता निधी उपलब्ध करण्यास मी कटीबध असून पूर्वी निधी उपलब्ध झालेल्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2022-23 अंतर्गत श्री. क्षेत्र मंगलमूर्ती देवस्थान, नवगण राजुरी ता. बीड येथे विकास कामे करणे बाबत निधीसह मंजुरी दि. 28 जुन 2022 देण्यात आलेली आहे. जुलै-ऑगस्ट 2022 ला याविषयावर स्थगिती देण्यात आलेली आहे. बीड विधानसभा क्षेत्रातील बीड शहरातील शहंशाहवली दर्गाह मन्सुरशाहवली दर्गाह, श्री.क्षेत्र खंडेश्वरी देवी मंदिर देवस्थान, श्री. क्षेत्र कंकालेश्वर मंदिर देवस्थान, श्री.पापनेश्वर मंदिर देवस्थान, श्री.क्षेत्र शनी मंदिर देवस्थान.बीड व शिरूर का. ग्रामीण श्री क्षेत्र कपिलधार देवस्थान, श्री.क्षेत्र नारायणगड देवस्थान,श्री.क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी देवस्थान, श्री.क्षेत्र रामगड देवस्थान, श्री.क्षेत्र भालचंद्र गणपती मंदिर देवस्थान लिंबागणेश, श्री क्षेत्र किल्ले भगवानगड वंजारवाडी व श्री.क्षेत्र ज्ञानेश्वर आश्रम दगडवाडी ता.शिरूर का., श्री.क्षेत्र तुळजाभवानी मंदिर देवस्थान भवानवाडी या तिर्थक्षेत्रांना पर्यटन अंतर्गत मंजुरी व विकास कामासाठी निधी देण्यात यावा.नारायण गड, कपिलधारवाडी, शंहशाअली दर्गा या देवस्थानाच्या उर्वरित निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर हा निधी प्राप्त होईल असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी याप्रसंगी मतदार संघातील  देवस्थानाच्या प्रमुखांना दिला. याप्रसंगी येवलवाडी हिवरसिंगा आणि पंचक्रोशीतील भाविकभक्त मोठ्या संख्येने सप्ताहा प्रसंगी उपस्थित होते.

COMMENTS