नगरच्या दोन पत्रकारांचा पोंभुर्ल्यात झाला गौरव…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या दोन पत्रकारांचा पोंभुर्ल्यात झाला गौरव…

अहमदनगर/प्रतिनिधी : आद्य पत्रकार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पोंभुर्ले गावी नगरमधील निशांत दातीर व मिलिंद चवंडके या दोन पत्रकारांना नुकत्याच

गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पोलिसाला पडले महागातl LokNews24
रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा
खुले नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार ?

अहमदनगर/प्रतिनिधी : आद्य पत्रकार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या पोंभुर्ले गावी नगरमधील निशांत दातीर व मिलिंद चवंडके या दोन पत्रकारांना नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनी सन्मान झाला. राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्या हस्ते पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’सभागृहात करण्यात आले.
सन 2019च्या ‘दर्पण’ पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागातून निशांत दातीर (संपादक, निशांत दिवाळी विशेषांक, अहमदनगर) व सन 2020 च्या दर्पण पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागातून मिलींद चवंडके (पत्रकार, अहमदनगर) यांचा समावेश होता. ज्येष्ठ पत्रकार भोसले यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, पोंभुर्ले गावचे उपसरपंच प्रदीप फाळके, सुधाकर जांभेकर, शांताराम गुरव आदी उपस्थित होते. प्रारंभी सभागृहातील जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन होऊन सन 2019 व 2020 च्या दर्पण पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

पत्रकारितेचा आशय कमी होतोय
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार भोसले म्हणाले, आज तंत्रज्ञानाच्या व्यापकतेमुळे छापील वृत्तपत्रांची मक्तेदारी कमी झाली असली तरी प्रसारमाध्यमांची गती वाढली आहे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये व्यापक होण्याला चांगली संधी आहे. मात्र, घडामोडींच्या मागे धावताना सर्वांना झटपट पत्रकारिता हवी असल्याने पत्रकारितेतील आशय निघून चालला आहे. त्यामुळे पत्रकारितेमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटत नाही. या पार्श्‍वभूमीवर, पत्रकारितेचा मूलभूत उद्देश कमी होऊ न देता लोकांच्या आशा-अपेक्षांना बळ देण्याचे काम पत्रकारितेतून ताकदीने केल्यास ते खरे बाळशास्त्री यांचे स्मरण ठरेल, असे ते म्हणाले. मराठी पत्रकारितेचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जावा यासाठी पत्रकारांनी एकजुटीने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बेडकिहाळ यांनी, कर्मभूमी मुंबईमध्ये बाळशास्त्रींचे स्मारक व्हावे आणि नियोजित कोकण विद्यापीठाला बाळशास्त्रींचे नाव द्यावे यासाठी पत्रकारांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. पुरस्कार प्राप्त पत्रकरांच्यावतीने नगरच्या चवंडके यांच्यासह योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे, जयपाल पाटील, संतोष कुळकर्णी, प्रा.रमेश आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अमर शेंडे यांनी मानले.

COMMENTS