Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोटी येथे स्वराज्य पक्षाचा भव्य पदग्रहन सोहळा संपन्न 

नाशिक प्रतिनिधी -  स्वराज्य पक्षात कोणत्याही जातीय प्रकारचा भेदभाव नसून हा पक्ष बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा आहे. स्वराज्याचा ध्वज तालुक्या

शासनाने यंदाचा पालखी सोहळा जैव सुरक्षा कवच पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी : नितीन महाराज मोरे
आजचे राशीचक्र सोमवार, ०४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
ठाकरे गटाचे भवितव्य काय ?

नाशिक प्रतिनिधी –  स्वराज्य पक्षात कोणत्याही जातीय प्रकारचा भेदभाव नसून हा पक्ष बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा आहे. स्वराज्याचा ध्वज तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहचवून बळकटी निर्माण करा. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना काम करीत आहे. इगतपुरी तालुका हा स्वराज्याचा बालेकिल्ला असून आपण सर्वांनी जीवाचे रान केले पाहिजे येणाऱ्या काळात लोकसभा, विधानसभा यांचे तोरण याच मतदारसंघातून बांधले जाईल याचा मला ठाम विश्वास आहे. स्वराज्य हे आता सक्रिय राजकारणात उतरणार असून स्वराज्याचा विचार न केल्यास बाजार समितीत तिसरा पॅनल निश्चित असल्याचे प्रतिपादन स्वराज्य पक्ष महाराष्ट्र संपर्क प्रमुख करण गायकर यांनी केले. घोटी येथे स्वराज्य प्रमुख  छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र संपर्क प्रमुख करण गायकर, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, राज्य कोर कमिटी सदस्य नवनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख आशीष हिरे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र शिरसाट,अध्यक्ष नारायण भोसले यांच्या नेतृत्वाखाली  इगतपुरी तालुका पदग्रहन सोहळा  नुकताच पार पडला. निश्चीतच महाराष्ट्राच राजकारण बघता स्वराज्य सक्षम पर्याय म्हणुन पुढे येइल. यावेळी करण गायकर बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  प्रस्तावना स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले यांनी केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव मामा गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे ,कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे ,ज्ञानेश्वर थोरात, किरण डोके, नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे, पुष्पाताई जगताप, मनोरामाताई पाटील, नितीन दातीर कार्यकर्ते प्रताप जाधव, ज्ञानेश्वर भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत  कार्यकर्त्यांनी स्वराज्य संघटनेत मोठ्या संख्येने पदग्रहन केले.

रेल्वे, महामार्ग, लष्कर हद्दीसाठी जमिनीचा त्याग करूनही भूमिपुत्रांना काम मिळत नाही. फक्त आश्वासनांची खिरापत वाटली जाते. भूमिपुत्रांना नाशिकच्या महानगर पालिकेत किमान २० टक्के भरतीत जागा मिळाल्या पाहिजेत. त्याची रचना करायची आहे. असेही करण गायकर म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  स्वराज्य संघटनेचे डॉ.महेंद्र शिरसाठ, स्वराज्य संघटनेचे इगतपुरी तालुकाप्रमुख नारायण भोसले, नारायण बाबा जाधव युवा तालुकाप्रमुख गोकुळ धोंगडे, सखाराम गव्हाणे, विद्यार्थी ता प्रमुख ऋतीक जाघव ,आरोग्य आघाडी तालुकाप्रमुख रोहीदास जाधव,धामणीचे माजी उपसरपंच गौतम भोसले, स्वराज्य संघटना उप तालुकाप्रमुख अरुण जुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते  ईश्वर भोसले, जालिंदर कार्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील भोर यांनी केले

यावेळी नारायण बाबा जाधव यांची व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख तर पुष्पाताई जगताप महिला राज्य कोर कमिटी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच तालुक्यातील विविध आघाड्यांचे तालुकाप्रमुख गटप्रमुख गणाप्रमुख यांच्याही नियुक्ती मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS