Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती जिल्हा रुग्णालयात औषधे मिळेना ; रुग्णांमध्ये संताप

  अमरावती प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील 95 टक्के नागरिक आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालयावरच अवलंबून आहेत, परंतु गेल्या वर्षभरापासून अमराव

आ. काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम बँकेची निवडणूक बिनविरोध
नर्मदा परिक्रमेमुळे आत्मिक समाधान मिळते – डॉ. राजेंद्र पिपाडा
नाफेड सरसकट कांदा खरेदी करू शकत नाही

  अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील 95 टक्के नागरिक आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालयावरच अवलंबून आहेत, परंतु गेल्या वर्षभरापासून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने अमरावती जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे.जिल्हा रुग्णालयात रुग्णांना औषध मिळत नसल्याने रुग्णांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे. डीपीसीतुन खरेदी केलेला औषध साठाही आता संपत आला असून याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे,जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रोजच्या ओपीडीत 300 ते 400 रुग्ण जवळपास आहे, परंतु रक्तदाब, मधुमेह,मिर्गी, सर्दी, खोकला,ताप व मानसिक आजार यावरील औषधी रुग्णालयात उपलब्ध नाही.

COMMENTS