Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी शारीरिक समतोल जोपासणे गरजेचे : डॉ. अनिता बांगर

म्हाळसाई हास्य क्लबतर्फे व्याख्यान संपन्न

नाशिक : एक निरोगी स्त्री ही ‘आनंदी स्त्री’ आहे, असे म्हटले जाते. परंतु महिला आपल्या शारीरिक परिवर्तनाकडे लक्ष देतात का? हा खरा प्रश्‍न आहे. यासाठ

दिल्लीतील शाळेत बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी
पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा
प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !

नाशिक : एक निरोगी स्त्री ही ‘आनंदी स्त्री’ आहे, असे म्हटले जाते. परंतु महिला आपल्या शारीरिक परिवर्तनाकडे लक्ष देतात का? हा खरा प्रश्‍न आहे. यासाठीच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी शारीरिक समतोल जोपासण्याचा निश्‍चय करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.बांगर स्पर्श वुमन्स हॉस्पीटलच्या स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. अनिता बांगर यांनी केले. चेतनानगर येथील म्हाळसाई हास्य क्लबतर्फे आयोजित व्याख्यानात डॉ. बांगर बोलत होत्या. यावेळी मानसी गडेकर, राधिका परब, सीमा देवदास, अमृता पाल, दिप्ती येवले उपस्थित होत्या. आयुष्यभर स्त्रीच्या शरीरात प्रचंड बदल घडतात, आपण जगण्यात इतके व्यग्र होतो की, आरोग्याकडे अजिबातच लक्ष देत नाही. भारतीय महिलांच्या जीवनशैलीत स्वत-पेक्षा तिला कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागते. 

 शक्यतो आहार हा साधा संतुलित असावा. कोणतेही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह रंग, वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट फूड, अजिनोमोटो टाळले पाहिजे. तळलेले पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी करा. बेकरी पदार्थांमध्ये वापरला जाणारा ‘मार्गरिन’ हा घटक हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे बेकरी पदार्थ टाळावेत. आठवड्यातून किमान ४ ते ५ दिवस व्यायाम करा. कोलेस्ट्रॉल नियंत्रण, रक्तदाब निरीक्षण, तणाव, मधुमेह व्यवस्थापन आहार नियंत्रण केल्यास आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होत असल्याची माहिती डॉ. अनिता बांगर यांनी दिली. यावेळी हास्य क्लबच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS