अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

Homeताज्या बातम्या

अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवल्याने दीड लाख तरुणांचा रोजगार गेला

वेदांता प्रकल्प(Vedanta Project) गुजरात मध्ये हलवण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याच

महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा कर्नाटकाचा डाव
बारामती जिंकण्यासाठी अजित पवारांनी रणशिंग फुंकले
कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

वेदांता प्रकल्प(Vedanta Project) गुजरात मध्ये हलवण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवल्याने दीड लाख तरुणांचा रोजगार गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली सरकार जनतेला गाजर दाखवत आहे. एकनाथ शिंदे हे सकाळी सहा वाजे पर्यंत काम करतात तर मग उठतात कधी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.

COMMENTS