Ahmednagar : महानगर पालिकेला दिले ‘ढब्बू मकात्या’ असे नाव (Video)

Homeशहरंअहमदनगर

Ahmednagar : महानगर पालिकेला दिले ‘ढब्बू मकात्या’ असे नाव (Video)

विजयादशमी चे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद या संघटनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करत अहमदनगर महानगरपालिकेला ढब्बू मकात्या असे नाव देण्य

स्मार्ट सिटीचे स्लाईड्स आणि वास्तवाचे खड्डे : नांदेडला गाजर नव्हे, जमिनीवरचा विकास हवा!
राज्यातील 29 महानगरपालिकांतील महापौर पदाच्या आरक्षणाची गुरुवारी सोडत
नांदेड-वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

विजयादशमी चे औचित्य साधून पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद या संघटनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करत अहमदनगर महानगरपालिकेला ढब्बू मकात्या असे नाव देण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील अमरधाम च्या भिंतीवर हे नामफलक लावून संघटनेच्यावतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले .अहमदनगर शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे. महानगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नगरकरांना दररोज वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेक आंदोलन करून सुद्धा  महानगरपालिका शहर व उपनगरातील रस्त्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे गांभीर्य दाखवत नाही त्यामुळे महानगर पालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच त्यांचा नाकर्तेपणा जनते समोर आणण्यासाठी संघटनेच्यावतीने अहमदनगर महानगरपालिकेचे ढब्बू मकात्या असे नामकरण करण्यात आले आहे ढब्बू मकात्या या नावाचा नेमका अर्थ काय या संदर्भात बोलताना संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट कारभारी गवळी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या

COMMENTS