Ahmednagar : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्यावर भीषण अपघात (Video)

Homeताज्या बातम्या

Ahmednagar : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्यावर भीषण अपघात (Video)

संगमनेर तालुक्यातील माऊली फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग 50 नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर मोटरसायकल व आयशर टेम्पो चा भीषण अपघ

निर्णायक टप्प्यात, पूर्वेचे पाणी पश्‍चिमेला वळवणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
पदाच्या माध्यमातून युवकांना पाठबळ देण्याचे काम -विक्रम राठोड
जुन्या बसस्थानकाच्या विकासातून रोजगारनिर्मितीची मागण; आ. गर्जे यांचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

संगमनेर तालुक्यातील माऊली फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग 50 नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर मोटरसायकल व आयशर टेम्पो चा भीषण अपघात झाला . या अपघातात मोटरसायकलस्वार राजू सोमनाथ वरपे राहणार वरवंडी तालुका संगमनेर चालकाला जबर दुखापत झाली आहे .सदर घटना अपघात दुपारच्या सुमारास झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 50 ट्राफिक पोलीस यांच्या मदतीने वाहन बाजूला घेण्यात आले . सदर अपघात ग्रस्त व्यक्तीला घारगाव येथील तांबे हॉस्पिटल संगमनेर येथे पुढील उपचारासाठी घेऊन गेले आहेत. सदर आयशर टेम्पो हा हरियाणा राज्यातील  आहे. अपघातग्रस्त झाल्यानंतर ड्रायवर  वाहन सोडून पसार झालेला आहे. अपघाताचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग 50 चे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात चालू आहे.

COMMENTS