Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेता साहिल खान याला अटक

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात पोलिसांची कारवाई

मुंबई ः महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अनेक अभिनेते, अभिनेत्रीचे हात गुंतले असून, पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी मुंबई पोल

कल्याण स्थानकात एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
कोकणच्या‘पीएमएवाय’साठी सहा लाख उत्पन्नांची मर्यादा
बेळगावसह 865 गावांसाठी देणार लढा

मुंबई ः महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अनेक अभिनेते, अभिनेत्रीचे हात गुंतले असून, पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी छत्तीसगडमध्ये जाऊन अभिनेता साहिल खान याला अटक केले आहे. साहिल खानला मुंबईमध्ये आणल्यानंतर हायकोर्टामध्ये दाखल केले होते. यावेळी कोर्टाकडून अभिनेत्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी मुंबई उच्च न्यायालायाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला रविवारी सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई हाय कोर्टाकडून अभिनेत्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्याची पोलीस कोठडी 1 मे पर्यंत आहे. ऑनलाइन बेटिंग प्लिकेशनचे प्रमोशन केल्याचा साहिल खानवर आरोप आहे. माटुंग्यामधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी महादेव ऑनलाइन गेमिंग बेटिंग अ‍ॅप विरोधात माटुंग्या पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर जवळपास 31 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर द लायन बुक अ‍ॅप नावाच्या एका अ‍ॅपमध्ये अभिनेता साहिल खान भागिदारीत असल्याचे कळताच पोलिसांनी कारवाई केली. मुंबई पोलिसांना या प्रकरणात गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी चौकशी सुरु केली. त्यामध्ये एकूण 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली होती. या प्रकरणात ईडीने मालमत्ता जप्तीची देखील कारवाई केली. त्यामुळे अभिनेता साहिल खानला ताब्यात घेण्यात आले आहे. साहिल खानची अटकपूर्व जामिन याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. तो मुंबईतून निघून गोवा, कर्नाटक, हैदराबाद असा प्रवास करत छत्तीसगढमध्ये पोहोचला होता. मुंबई पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते. अखेर छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे.

COMMENTS