Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकावर कारवाई

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याची विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली करावी, असा

बेशिस्त-बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करा : ना. देसाई
कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉ. अतुल भोसले मैदानात
पोतलेत स्वयंभू मारूती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याची विभागाबाहेर अकार्यकारी पदावर बदली करावी, असा अहवाल मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी पुणे विभागाच्या नोंदणी उपनिबंधकांना दिला आहे. त्यामुळे या लिपिकावर कारवाईची शक्यता आहे. वसंत विष्णू कुंभार (इस्लामपूर) असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
येथील नोंदणी विभागात तुकडेबंदी कायद्याचा भंग करत जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याची तक्रार काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी केली होती. याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय कार्यालयाने दिले होते. तपास पथकाने जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीत झालेल्या 501 खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी केली होती. त्यातील 110 व्यवहारामध्ये तुकडेजोड, तुकडेबंदी कायद्याचा भंग झाल्याचे दिसून आले होते. हा अहवाल मिळताच जाधव यांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

COMMENTS